रेनवडी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मुकेश डेरे तर व्हा. चेअरमन बाबाजी येवले
पारनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या रेनवडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. दि. ७ जुलै रोजी पदाधिकारी निवड प्रक्रिया ही पार पडली. यावेळी रेनवडी सोसायटीच्या चेअरमन पदी मुकेश चंद्रकांत डेरे व व्हा. चेअरमन बाबाजी येवले यांची निवड झाली.
रेनवडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मध्ये एकूण 13 संचालक असून जय बजरंग ग्रामविकास शेतकरी पॅनल व रेणुका माता ग्रामविकास शेतकरी पॅनल यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली होती. जय बजरंग पॅनलचे ८ तर रेणुकामाता पॅनलचे ५ उमेदवार विजयी झाले होते.
पदाधिकारी निवड प्रक्रियेमध्ये चेअरमन पदी मुकेश डेरे यांची निवड बिनविरोध पार पडली, तर व चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया झाली. यामध्ये जय बजरंग पॅनलचे बाबाजी येवले यांचा अर्ज भरला होता, तर रेणुका माता पॅनल कडून भगवान डेरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे व्हा. चेअरमन पदासाठी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर बाबाजी येवले यांना ८ तर भगवान ढेरे यांना ५ मते मिळाली व त्यामुळे व्हा. चेअरमन पदी बाबाजी डेरे हे विजयी घोषित करण्यात आले.
रेनवडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही पारनेर तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण सेवा सोसायटी असून नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी या सेवा सोसायटीच्या माध्यमातून काम केले जाते. नवनिर्वाचित चेअरमन मुकेश डेरे व व्हा. चेअरमन बाबाजी येवले हे पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके, जिल्हा बँकेचे चेअरमन उदयदादा शेळके (चेअरमन जी. एस. महानगर बँक, मुंबई) यांचे विश्वासू सहकारी आहेत. यावेळी नवनिर्वाचे चेअरमन व चेअरमन यांनी निवडीनंतर सेवा सोसायटीच्या माध्यमातून या पुढील काळात शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या समस्या व प्रश्नांना नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. निवडीनंतर चेअरमन व्हा. चेअरमन यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
रेनवडी सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन हे मुकेश चंद्रकांत डेरे हे मुंबई येथे व्यावसायिक आहेत तर मुंबई या ठिकाणी वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले व रेनवडी गावच्या ग्राम विकासासाठी नेहमीच योगदान देणारे मुंबई येथील सायन हॉस्पिटलचे डीन व बी.के.सी. जम्बो कोविड सेंटरचे डॉ. राजेश चंद्रकांत डेरे यांचे ते बंधू आहेत.
सेवा सोसायटीच्या या निवड प्रक्रिये दरम्यान रेनवडी गावचे सरपंच श्रीकांत डेरे, उपसरपंच बाबाजी येवले, बाबाजी य. येवले, बाळासाहेब येवले, अंजाभाऊ डेरे, गणेश डेरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संपत डेरे, उपाध्यक्ष शरद झिंजाड, ग्रामपंचायत सदस्य दत्ता येवले, बाबाजी येवले, संदीप भोर, राजाराम येवले, बाबाजी पानसरे, अंकुश भोर, लालासाहेब येवले, विक्रम येवले, राजेंद्र डेरे, भाऊसाहेब येवले, राहुल येवले, शरद येवले, दीपक भोर, रवींद्र डेरे, पवन भोर, उत्तम येवले, रामदास कुऱ्हाडे, संतोष भोर, रवींद्र येवले, श्रीराम डेरे, भानुदास येवले, बाबाजी क. येवले यांनी विशेष परिश्रम घेतले. जय बजरंग ग्रामविकास शेतकरी पॅनल या सत्ताधारी पॅनलचे सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक मंडळ आनंदराव झिंजाड, हनुमंत डेरे, शिवाजी शिंदे, बबन गोसावी, प्रमिला डेरे, झुंबरबाई डेरे यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे व चेअरमन व व्हा. चेअरमन पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
रेनवडी सेवा सोसायटीच्या माध्यमातून काम करत असताना या पुढील काळात गावातील सर्वांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर समस्यांवर काम करणार आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ते कर्ज वाटप करण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदयदादा शेळके यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकरी वर्गाला न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.
– केश चंद्रकांत डेरे, (नवनिर्वाचित चेअरमन रेनवडी सेवा सोसायटी)