बुलढाणा/ मेहकर (जिल्हा प्रतिनिधी) – मेहकर तालुक्यातील अंगणवाड़ी मदतनीस पदांच्या ४० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया २६ जूनपासून राबविण्यात येत आहे. दरम्यान, सदर भरती प्रक्रिया पारदर्शक होणार असून, यासाठी कोणीही आमिषाला बळी पड़ू नका, असे आवाहन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी घनतोड़े यांनी केले आहे.
मेहकर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प एक व प्रकल्प दोन अंतर्गत तालुक्यातील अंगणवाड़ी मदतनीस पदांची ४० रिक्त पदे भरण्यात येत आहेत. यामध्ये प्रकल्प एक अंतर्गत जानेफळ व पेनटाकळी येथील प्रत्येकी दोन पदे, तर मुंदेफळ, उकळी, बोरी, सोनाटी, लव्हाळा, हिवरखेड़, वड़गावमाळी, कळमेश्वर, थार व सुळा येथील प्रत्येकी एक अशी १४ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
मेहकर प्रकल्प दोन अंतर्गत ड़ोणगाव चार पदे तसेच भोसा, गोहोगाव, बेलगाव, चिंचाळा, नागापूर, हिवरा साबळे, रत्नापूर, कर्हाड़वाड़ी, आरेगाव, शेलगाव देशमुख, कनका, वड़ाळी, घाटनांद्रा गोमेधर, घाटबोरी, लोणी गवळी व टेंभूरखेड़ येथे प्रत्येकी एक पद, तर अंजनी बु. दोन व देऊळगाव साकरशा येथील तीन रिक्त पदे अशी २६ रिक्त पदे भरण्यात येत आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी २६ जून ते १० जुलैदरम्यान कार्यालयीन वेळेत मेहकर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज स्विकारण्यास येणार आहेत.
अंगणवाड़ी मदतनीस पदासाठीची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार आहे. येथे भ्रष्टाचाराला कोणताही वाव नसून कोणीही कोणत्याही आमिषाला बळी पड़ू नये, तसेच कोणताही वशिला चालणार नाही, असे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी घनतोड़े यांनी स्पष्ट केले आहे.
———-