बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यात पक्ष बळकटी व वाढीसाठी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उमेश राठोड यांना युवासेना जिल्हा अध्यक्ष ऋषी जाधव यांच्याकडून युवासेना लोणार तालुका उपप्रमुखपदाची नियुक्ती देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीवार्दाने पक्ष नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने उमेश श्रीराम राठोड राहणार बिबी यांची युवा सेना उपतालुका प्रमुख लोणार या पदावर निवड करण्यात आली आहे. उमेश राठोड हे शिवसेना पक्षात उत्कृष्ठ शिवसैनिक म्हणून काम करत आहेत, याचीच दखल घेऊन या पदावर त्यांची निवड करण्यात आली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करण्यासाठी उमेश राठोड यांनी पक्ष संघटनेतील कार्य जोमाने व निष्ठेने करावे, यासाठी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर तालुक्यात ठीकठिकाणी उमेश राठोड यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. पक्षश्रेष्ठीकडून आपण करत असलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडून पक्षवाढीसाठी काम करेन, असे उमेश राठोड म्हणाले. दिलेल्या जबाबदारी बद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.