सोलापूर (संदीप येरवडे) – आंतरजिल्हा बदलीसाठी ९२ शिक्षक आले आहेत. हे शिक्षक सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांमध्ये शाळा पाहण्यासाठी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे नांदेड, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील शिक्षकांना शाळा मिळाली नसल्याने त्यांची मात्र तारांबळ झाली आहे.
आंतर जिल्हा बदलीसाठी ९२ शिक्षक पात्र आहेत. या शिक्षकांच्या बदल्या गेल्या दोन महिन्यापूर्वी झाल्या होत्या. परंतु प्रशासनाच्या कासव गतीच्या कारभारामुळे हे शिक्षक वेटिंग वर होते. या शिक्षकांना शाळा देण्यात आल्या नव्हत्या. परंतु नुकतेच या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी शाळा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हे शिक्षक झेडपी मध्ये ठाण मांडून बसले आहेत. आपल्याला कोणती शाळा देण्यात येईल किंवा कोणती शाळा सोईस्कर होईल यासाठी हे शिक्षक रात्री सात वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये शाळेची यादी पाहण्यासाठी बसले होते. त्यातील बरेच शिक्षक हे पर जिल्ह्यामधून आले होते. तर काही शिक्षक सोलापूरमधूनच दुसर्या जिल्ह्यामध्ये गेले होते ते आता परत आले आहेत. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील जे शिक्षक बाहेर जिल्ह्यात गेले होते हे पुन्हा परत आल्यामुळे त्या शिक्षकांच्या चेहर्यावर मात्र समाधान व्यक्त केले जात आहे. कारण ३०० ते ४०० किलोमीटर वरून जिल्ह्यामध्ये जाऊन नोकरी करायचे खूपच कठीण होते. तरी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पदस्थापना देण्यात येणार असल्यामुळे या शिक्षकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून जवळपास ९२ शिक्षक आले आहेत. या शिक्षकांना नेमके कोणत्या शाळा द्यायचे आहेत याची यादी आपण लावणार आहोत.
– संजय जावीर, शिक्षणाधिकारी प्राथमिक
————-