Head linesPachhim Maharashtra

प्रशिक्षणार्थी आयपीएस बी. चंद्रकांत रेड्डी यांच्याहाती शेवगाव पोलिस ठाण्याची सूत्रे!

UPDATE : विलास पुजारी यांची बदली रद्द!

शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना आज दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कक्ष विभागात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर झालेली बदली रद्द करण्यासाठी भाजपचे काही पदाधिकारी जोरदार फिल्डिंग लावत असल्याची शहरात चर्चा होती. त्यातच झालेली बदली सायंकाळी रद्द करण्यात आल्याचा मेसेज काहीजणांना प्राप्त झाला असून, पुजारी यांच्या चाहत्यांनी शहरात फटाकेही फोडल्याचे कळते आहे. पुजारी यांची बदली रद्द झाली असली तरी, येथे दबंग पोलिस अधिकारी असल्याने अवैध धंदेवाल्यांना फारसी वळवळ करता येणार नाही, अशी चर्चा शहरात रंगली आहे.


शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – दबंग पोलिस अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी (आयपीएस) बी. चंद्रकांत रेड्डी यांच्याहाती शेवगाव पोलिस ठाण्याची सूत्रे देण्यात आली आहेत. ते या पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदाच्या कामकाजाचा प्रत्याक्षनुभव घेतील. आधीच वादग्रस्त ठरलेल्या या पोलिस ठाण्याचा कारभार दबंग आणि त्यातच प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकार्‍याच्या हाती आल्याने तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) दाखल झालेले व पुढील काळात जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम करणार असणारे प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना प्रत्यक्षानुभवासाठी शेवगाव पोलिस ठाण्याचा कारभार देण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. तर शेवगावचे ठाणेदार विलास पुजारी यांची नगर येथील मुख्यालयात बदली करण्यात आली होती, परंतु नंतर ती रद्द झाली असल्याचे कळते. आयपीएस रेड्डी यांनी आज सायंकाळी या पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला. १९ जून ते ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत रेड्डी हे या ठाण्याचा स्वतंत्रपणे कारभार पाहणार आहेत. परिविक्षाधीन कालावधीत नवीन आयपीएस हे चांगली कामगिरी करत असतात. त्यातच रेड्डी हे धाडसी व दबंग पोलिस अधिकारी असल्याने शेवगाव तालुक्यातील अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


शेवगाव पोलिस ठाणेहद्दीत कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा!

शेवगाव शहरातील दगडफेकीच्या प्रकरणापासून चर्चेत आलेले शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांची बदली झाली होती.  त्यांना अहमदनगर नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश देण्यात आलेले होते.  त्यांची बदली रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले असल्याचीही शहरात चर्चा होती. त्या प्रयत्नांना यश येऊन पुजारी यांची बदली रद्द झाली असल्याचे कळते. शेवगाव शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे. यामध्ये शेवगाव शहर व तालुक्यात अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, वेश्या व्यवसाय, मटका, अवैध दारू, खून, मारामार्‍या, बोधेगाव येथील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब खेडकर यांच्यावर गावगुंडांनी केलेला हल्ला प्रकरण, अशा घटनांमुळे शेवगाव पोलिस ठाण्याचे नाव बदनाम झालेले आहे. आता या पोलिस ठाण्यास शिस्त लावून अवैध धंदेवाले, गावगुंडांना वठणीवर आणण्याचे काम आयपीएस बी. चंद्रकांत रेड्डी यांना करावे लागणार आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!