ChikhaliCrime

पोलिस नाईक अमोल गवईंच्या बदलीने रायपूरकर हळहळले!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – रायपूर पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेचे कर्तव्यदक्षतेने कामकाज पाहणारे पोलिस नाईक अमोल गवई यांची चिखली पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. रायपूर येथे कार्यरत असताना, त्यांनी ग्रामस्थांना आपुलकीची वागणूक दिली. अनेकांना कायदेशीर सहाय्य केले. तसेच, सर्वांची सलोखा निर्माण केला होता. त्यामुळे त्यांना निरोप देताना ग्रामस्थांसह विविध जाती-धर्माच्या नागरिकांना अंतकरण भरून आले.

पोलीस म्हटलं तर एक वेगळा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतो. असे म्हणतात पोलीस सोबत दोस्ती चांगली ना दुश्मनी चांगली, अनेक जण पोलिसाकडे नकारात्मक भूमिकेतून बघत असतात. आपल्या बाजूने चांगले वागले तर आपण त्यांना चांगले म्हणतो, परंतु आपण गुन्हा करूनही जर पोलीस योग्य भूमिका घेत असेल, तेव्हा मात्र आपण त्यांना वाईट म्हणतो. ही प्रवृत्ती आज बघावयास मिळत आहे. परंतु असे अनेक कमी पोलीस शिपाई सापडतात की जे एका ठिकाणी नोकरीसुद्धा करतात आणि संपूर्ण गावातील परिसरातील खेड्यापाड्यातील सर्व समाजातील लोकांच्या सोबत पोलीस शिपाई म्हणून न वागता एक मित्र म्हणून वागून लोकांची सहानुभूती मिळवतात. असेच पोलीस शिपाई अमोल गवई हे चिखली तालुक्यातील पोलीस स्टेशन म्हणजेच रायपूर येथे कार्यरत असताना ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत तर बनलेच, पण त्यांनी आपले कर्तव्यदेखील इमानदारीपूर्वक निभावले.

पोलिस स्टेशनच्या गोपनीय शाखेचे कामकाज पाहणारे कर्तव्यदक्ष अमलदार पोलिस नाईक अमोल गवई यांची पोलीस स्टेशन रायपूरमधून चिखली येथे बदली झाल्याने त्याबद्दल सर्व स्तरावर हळहळ व्यक्त केली गेली. गावातील सर्व समाजाचे, तसेच राजकीय, पत्रकार सर्वांसोबत चांगले संबंध ठेवून आपले कर्तव्य हे चोखपणे पार पाडून तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करणारे कर्मचारी अमोल गवई हे बदली झाल्याने सर्व गावांमधून त्यांचा निरोप समारंभ घेऊन सर्वजण ते आपल्यामधून जाण्याचे दुःख व्यक्त करत आहेत. तसेच त्यांनी केलेल्या रायपूर पोलिस स्टेशन हद्दीतील व परिसरातील कुठल्याही धार्मिक उत्सव असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, शिवजयंती असेल, गणेश उत्सव असेल, नवरात्र असेल, ईद असेल, महात्मा फुले जयंती अशा सर्वच समाजातील जयंती उत्सवामध्ये ते नेहमी सहभागी होत असत. शिवाय, सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करत असत. ३०२ सारख्या गुन्ह्यांमध्ये त्यांनी दाखवलेली तत्परता तसेच महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा सैलानी बाबा याचे सर्व नियोजन करणे, गुन्ह्यांचा उकल करण्यामध्ये तरबेज असलेल्या पोलीस स्टेशनमधून जात असल्याने सर्व नागरिकांमध्ये त्यांचा जाण्याचा सर्वांना दुःख होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!