Pachhim MaharashtraSOLAPUR

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांची विद्यापीठ परीक्षेत चमकदार कामगिरी

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – नुकत्याच जाहीर झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या तृतीय वर्ष प्रथम सत्र अभियांत्रिकीच्या निकालामध्ये सोलापूर सिंहगडची माधुरी नाईकनवरे हिने ८७ टक्के गुण मिळवून विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच प्रतीक्षा भोसले विद्यापीठात द्वितीय, अभिषेक लोमटे विद्यापीठात चतुर्थ, अपेक्षा माळी विद्यापीठात सहावा क्रमांक पटकवाला.

विद्यापीठाच्या गुणांनुक्रमे पहिल्या सहा ६ मध्ये सोलापूर सिंहगडच्या ४ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. तसेच या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व शेखर जगदे तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागप्रमुख प्रा. विजय बिरादार, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पालक व विद्यार्थांच्या विश्वासास पात्र राहून महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे, त्याबद्दल महाविद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील उत्कृष्ठ प्राध्यापक वर्ग व उत्कृष्ठ शिक्षण प्रणालीमुळे हे यश आम्हाला प्राप्त करता आले असल्याचे माधुरी नाईकनवरे विद्यार्थीनी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!