AalandiPachhim Maharashtra

समाजसेवक अण्णा हजारे यांचा वाढदिवस आळंदीत साजरा

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवस निमित्त आळंदी मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रींचे चलपादुकांची पूजा, अभिषेक, दर्शन करीत जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास राळेगणसिद्धी पुणे जिल्हा समिती, खेड तालुका समिती, आळंदी शहर समिती पदाधिकारी, समिती सदस्य यांचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आळंदीत विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे. आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पुणे जिल्हा समिती अध्यक्ष सुरेशभाऊ टाकळकर, पुणे जिल्हा संघटक कार्याध्यक्ष पै. बाळासाहेब चौधरी, खेड तालुका समिती अध्यक्ष प्रकाश पाचारणे, आळंदी शहर अध्यक्ष अर्जुन मेदनकर ,स्वाती टोपे, माजी सरपंच कुंडलिक कोहिनकर, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर,उद्योजक राहुल चव्हाण, मनोहर दिवाने, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, दक्षता समिती अध्यक्ष किरण नरके, सहदेव गोरे, शिरीष कारेकर, बाळासाहेब वहिले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांना दिर्घआयुरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रमांत आळंदी सिद्धबेट येथे अजाण वृक्ष पूजा, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरण जनजागृती, सिद्धबेट येथे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिलाताई शिंदे, संगितरत्न, भजन सम्राट कल्याणजी गायकवाड, पशु कल्याण अधिकारी अँड.निलेश आंधळे गोरक्षक, माऊली दास महाराज, पै बाळासाहेब चौधरी, अर्जुन मेदनकर, पिराजी नेवसे महाराज, स्वकं सेवा मंडळ महिला अध्यक्षा आशा तापकीर, डॉ. हिरामण भुजबळ, महादेव घुले, सुनील वाळुंज, कैलास दुधाळे, अतुल सवाखंडे यांचा विशेष उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल सन्मानपत्र देऊन सामाजिक बांधिलकीच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. भजनसम्राट कैवल्य गायकवाड यांचे पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचलन जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ टाकळकर यांनी केले. संयोजन पै. बाळासाहेब चौधरी, अर्जुन मेदनकर यांनी केले. आभार खेड तालुका अध्यक्ष प्रकाश पाचारणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!