– दिंडी वारकर्यांच्या – अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश
आळंदी (अर्जुन मेदनकर) – ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी ११ जूनला आळंदीतून प्रस्थान होणार आहे. यासाठी राज्यासह परिसरातून लाखो भाविक आळंदीत येणार असल्याने सोहळ्यातील वाहतुकीचे नियोजनासाठी, सुरक्षित सुरळीत सोहळ्यासाठी ६ जून ते १२ जून या कालावधीत गर्दी असते. यामुळे वारकर्यांची आणि अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर वाहनांना ७ १२ जूनपर्यंत आळंदीत प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली असल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.
या काळात पुढील प्रमाणे वाहतुकीचे नियोजन राहणार आहे. यात बंद असणारे मार्ग आणि पर्याची मार्ग पुढील प्रमाणे आहेत.
१ ) पुणे-आळंदी रस्त्यावर मॅग्झिन चौक येथे नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण : मॅक्झिन चौक
पर्यायी मार्ग: पुणे-दिघी-मॅग्झिन चौक-भोसरी-मोशी-चाकण
२ ) मोशी- देहुफाटा रस्त्यावर डुडूळगाव जकात नाका येथे नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण: हवालदार वस्ती
पर्यायी मार्ग : मोशी-चाकण-शिक्रापूर तसेच मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक-दिघी
३)चाकण (आळंदी फाटा)- आळंदी रस्ता येथे इंद्रायणी हॉस्पिटलजवळ नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण: आळंदी फाटा
पर्यायी मार्ग: चाकण-मोशी-मॅग्झिन चौक-दिघी-पुणे (पुणे बाजूकडे जाण्याकरिता),
तसेच चाकण-शिक्रापूर-नगर हायवे पुढे सोलापूर हायवे
४)वडगाव घेनंद (शेलपिंपळगाव फाटा)- आळंदी रस्ता कोयाळी कमान येथे नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण : कोयाळी फाटा
पर्यायी मार्ग : वडगाव घेनंद-शेलपिंपळगाव फाटा-चाकण-नाशिक हायवे रोडने पुणे
५) मरकळ-आळंदी रस्ता, पी.सी.एस. कंपनी फाटा येथे नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण: धानोरे फाटा\पीसीएस चौक फाटा
पर्यायी मार्ग : मरकळ-सोळू-धानोरे-चर्होली खुर्द- पीसीएस कंपनी फाटा बायपास रोडने चर्होली बु. पुणे
मरकळ-कोयाळी-वडगाव घेनंद-पिंपळगाव फाटा-चाकण
६) चिंबळी चिंबळी फाटा – आळंदी रस्ता, केळगाव बायपास येथे नाकाबंदी
रोड बंद करण्याचे ठिकाण: चिंबळी फाटा
पर्यायी मार्ग : चिंबळी-मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक-दिघी-पुणे या प्रमाणे राहणार आहे.
स्थानिक आणि कामगार ओळखपत्र पाहून सोडणार : गोडसे
आळंदीतील जे कर्मचारी कामानिमित्त आळंदीच्या बाहेर जातात. अशा सर्व कामगार आणि स्थानिक नागरिक यांना पासची व्यवस्था करण्यात आली आहे. पाससाठी अर्ज करताना सोबत आळंदीत राहत असल्याचा पुरावा, ज्या कंपनीत काम करत आहे तेथील ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी कॉलेजचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. यासाठी येत्या ६ जून पासून पास देण्यात येणार असल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे यांनी सांगितले.