आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील हवेली भागात गुरुवारी पाणी पुरवठा तांत्रिक कारणास्तव बंद रहाणार असल्याचे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. तीर्थक्षेत्र आळंदी साठी भामा आसखे धरणातून पुण्यास देण्यात आलेल्या पाणी पुरवठा स्कीम मधील कुरुळी जॅकवेल येथून (रॉ वॉटर) पाणी पुरवठा केला जातो. तत्पूर्वी पाणी हे भामआसखेड येथील धरणातून येथे आणले जाते. शुद्धीकरणा पूर्वी वॉल्व्ह ठेवून तेथून पाणी आळंदीला दिले जाते. भामा आसखेड येथील केंद्रातील विद्युत पुरवठा तांत्रिक कामासाठी २७ एप्रिल ला बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे आळंदी ( हवेली ) येथील पाणी पुरवठा गुरुवारी मध्यरात्री एक पासून ते सायंकाळी आठ पर्यंत बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.
हवेली विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार असून भामा आसखेड धरणातून २८ एप्रिल ला पाणी पुरवठा वेळेत सुरु झाल्या नंतर आळंदी ( हवेली ) विभागात झोन निहाय पाणी पुरवठा होणार आहे. २९ एप्रिल ला आळंदी गावठाणात पाणी पुरवठा झोन निहाय होईल. यामुळे उपलब्द्ध पाण्याचा वापर नागरिकांनी जपून करावा. पाण्याची नासाडी करून नये तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी नागरिकांना केले आहे. आळंदी खेड आणि आळंदी हवेली या भागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. नागरिकांची दैनंदिन पाणी पुरवठा रोज व्हावा अशी मागणी असल्याचे माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी सांगितले. पाण्याचा पुरेशा प्रमाणात आणि उच्च दाबाने पाणी पुरवठा व्हावा यासाठी सर्व नळजोड धारकांचे नळांस पाणी पुरवठा मीटर बसविण्यात यावे अशी मागणी घुले यांनी केली आहे. यासाठी आळंदी नगरपरिषदेने या पूर्वी निविदा प्रक्रिया देखील केली असून पाणी मीटर बसविल्यास पाणी वाया न जात नागरिक काटकसरीने पाण्याचा वापर करतील असे माजी नगरसेवक घुले यांनी सांगितले.