– अखेर बैठकीला पोलीस पाटलांसह सरपंच व प्रतिष्ठित मंडळींची लागली हजेरी
– जयंतीदिनी दारूविक्री बंद करावी – पोलीस पाटील
मेहकर (अनिल मंजुळकर) – जानेफळ पोलिसांना एकाच आठवड्यात दोनदा शांतता समितीची बैठक घ्यावी लागली आहे. यापूर्वी ठाणेदारांनी मोजक्याच व निवडक लोकांसोबत अशी बैठक घेतली होती. याबाबत ब्रेकिंग महाराष्ट्रने प्रखड वृत्त प्रकाशित केले होते. तसेच, शहरातील काही विधीज्ज्ञांनीदेखील पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, आगामी सण व जयंती उत्सव पाहाता, ठाणेदारांना दुसर्यांदा शांतता समितीची बैठक घ्यावी लागणी असून, या बैठकीला सरपंच, पोलिस पाटील यांच्यासह प्रतिष्ठित मंडळींना बोलवावे लागले आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना ठाणेदार प्रवीण मानकर म्हणाले की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद हे सण आनंदात व मोठ्या उत्साहात साजरे करा. परंतु उत्सव साजरा करत असताना कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून पोलिसांना सहकार्य करा, कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. मिरवणुकीदरम्यान शासनाने ठरवून दिल्याप्रमाणात ध्वनी प्रक्षेपणाचा वापर करा, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवा, कुणाच्या भावना दुखतील असे वर्तन करू नये, शांततेत आनंदात उत्सव साजरे करावीत, असे ते म्हणाले. तसेच, जागरुक पोलीस पाटील यांनी, पोलिसांनी दारूबंदी करावी. दोन तीन दिवस अगोदरच दारूविक्री करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहनसुध्दा शांतता बैठकीत ठाणेदारांनी केले. त्यामुळे आता ठाणेदार कितपत दारूविक्री करणार्यांवर कारवाई करतात हे पाहणेसुध्दा महत्त्वाचे आहे.
यापूर्वी जानेफळ पोलिस ठाण्यांत अवघ्या सात ते आठ निवडक लोकांची शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने बातमी प्रसिद्ध केली असता, ठाणेदार यांनी पुन्हा शांतता समितीची बैठक बोलावली, हे विशेष. आजच्या या बैठकीला पत्रकार गजानन दुतोंडे, अमर राऊत, प्राध्यापक कृष्णा हावरे, गणेश सवडतकर, अनिल मंजुळकर, सैय्यद महेबुब, रविंद्र वाघ, सागर गव्हाड यांच्यासह शिवसेनेचे महादेव पाखरे, सामाजिक कार्यकर्ते शेख अजीज भाई, वकिल राजेश दाभाडे, पोलीस पाटील यांच्यासह पोलिस बांधव व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रायटर पोलीस कॉन्स्टेबल विनोद फुफाटे, टकले साहेब, चतरकर, अंभोरे व इतर पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
——————