मलकापूर पांग्रा (डॉ. गंगाराम उबाळे) – मेहकर आगाराची मेहकर येथून सकाळी व दुपारी अशी दोन वेळेस जालना जाणारी मेहकर-जालना-दरेंगाव ही बसफेरी पाडळी शिंदे, मेंडगाव, सावखेड नागरे, मनुबाई फाटा, नागणगाव, सुरा, सरंबा फाटा, मंडपगाव नवीन गावठाण, देऊळगावमही या मार्गे वळविल्यास प्रवासीवर्ग यांना सोईची होईल, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर मेहकर आगार व्यवस्थापक यांच्याकडून या मार्गे ही बसफेरी ५ एप्रिल रोजी सुरू करण्यात आली. ती बसफेरी गावागावांत पोहोचताच चालक व वाहक यांचा रुमाल टोपी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गावोगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मेंडगाव येथे भगवान कायंदे यांनी तर पाडळी शिंदे येथे प्रकाश शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी परमेश्वर शिंदे, बबनराव शिंदे, गुलाबराव शिंदे, समाधान शिंदे, गजानन शिंदे, रवी वायाळ, सुरेश देशमुख, गोपाल शिंदे, शिवाजी दांडगे, अविनाश जाधव, शिवाजी शिंदे, माणिकराव शिंदे, राजू ठेंग, एकनाथ शिंदे, ओम देशमुख, विजय शेळके, विष्णू शिंदे, मंगेश शिंदे, माधव शिंदे रामकिसन सरोदे, रमेश शिंदे, प्रकाश शिंदे, संदीप शिंदे, ज्ञानेश्वर पडुळकर, विठ्ठल शिंदे यांच्यासह मेंडगाव, पाडळी शिंदे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बसफेरी या मार्गाने सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, ती नियमित सुरू रहावी, अशी मागणी केली आहे. तसेच मेहकर आगार व्यवस्थापकांचे आभार व्यक्त केले आहेत.
—————