शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी माजी पोलीस निरीक्षक व समाजसेवक महादेव दराडे यांना त्यांनी सामाजिक क्षेत्राबरोबरच शेतकर्यांच्या विविध समस्यांना शासन दरबारी वाचा फोडल्याबद्दल त्यांना बहुभाषिक भाऊ-बाबा वंजारी संघ महाराष्ट्र यांच्यावतीने महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे राज्यस्तरीय समाजभूषण समाजसेवक पुरस्कार नुकताच जय भगवान महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब सानप व जेष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे व बहूभाषिक भाऊ-बाबा वंजारी संघ महाराष्ट्राच्या अध्यक्षा लक्ष्मीताई गर्कळ यांच्याहस्ते सन्मानपूर्वक दिमाखदार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महिला व बालकल्याण सभापती सौ.हर्षदाताई काकडे व पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनीताताई दौंड, बाळासाहेब ढाकणे आदी उपस्थित होते. हा पुरस्कार मला सदैव पाठबळ व कायम प्रेरणा देत राहील, असे मत पुरस्कारप्राप्त श्री दराडे यांनी व्यक्त केले. राज्यस्तरीय समाजभूषण समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल महादेव दराडे यांचे समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.