SOLAPUR

सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वडवळ येथे श्रमदान शिबीर उत्साहात

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) –  केगांव येथील एन. बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत १३ मार्च ते १९ मार्च या कालावधीत ‘ वडवळ ‘ या गावात श्रमदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महविद्यालयाचे ५० स्वयंसेवक सहभागी झाले होते. या शिबिराचे उद्घाटन शाहिद स्मारकाची स्वच्छता व वृक्षारोपण करून झाली.

या उद्घाटनप्रसंगी वडवळ गावचे सरपंच जालिंदर बनसोडे, शाहू धनवे, राहुल मोरे, श्रीकांत शिवपुजे, शहाजी देशमुख, मनोजकुमार मोरे, प्रा. सुरज धनवे, प्रा. रवींद्र देशमुख, प्रा. शशिकांत लामकाने यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा मुख्य उद्देश हे स्वच्छता, वृक्षारोपण व जन जागृती हे होते. या दरम्यान महाविद्यालयाच्या वि्यार्थ्यांनी वडवळ येथील हुतात्मा विश्वनाथ यांच्या स्मारकाची स्वच्छता व वृक्षारोपण केले व झाडांसाठी कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था करण्यात केली व या शिबिरात श्रीकृष्ण मंदिर व परिसर याची स्वच्छता व वृक्षारोपण केले.

या दरम्यान राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत गावातून प्रभात फेरी काढली व भक्त निवास परिसर स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. या दरम्यान बापूसाहेब दळवे, निलेश व्यवहारे, आकाश फाटे, मनोज मोरे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर नवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रा. सुरज धनवे, प्रा. रवींद्र देशमुख व प्रा. शशीकांत लामकाने या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यासोबत राहून शिबिर यशस्वीरित्या पार पाडले. तसेच विद्यार्थी प्रतीनिधी साक्षी देशमुख, संकेत उमर्जी, धनश्री तळेकर, समरीन बगली, फरीद शेख, सौरभ सुतार, निखिल जोशी, किरण शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!