BULDHANAMEHAKARVidharbha

खामगाव तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे मोठे नुकसान!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यासह खामगाव तालुक्यात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. यामध्ये रब्बीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. आज, २१ मार्चरोजी खासदार प्रतापराव जाधव यांनी पीक नुकसानीची पाहणी करून सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे, खचून जाऊ नका, असा धीर दिला.

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपूर्वी वादळीवारा व गारपीटसह जोरदार अवकाळी पाऊस पड़ला. यामुळे गहू, हरभरा, पाटाची पिके, आंबा, लिंबू फळबागासह इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी खचला गेला. खामगाव तालुक्यात यांची तीव्रता जास्त असल्याने नुकसानही जास्त झाले. आज, २१ मार्चरोजी खा. प्रतापराव जाधव यांनी खामगाव तालुक्यातील निमखेड़, शिराळा, पाळा, हिवरखेड़ शिवारात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. खचून जाऊ नका सरकार तुमच्यासोबत आहे, असा धीर शेतकर्‍यांना दिला. वस्तूनिष्ठ पंचनामे करून तातड़ीने प्रस्ताव सादर करा व एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय अवताड़े, तालुका प्रमुख सुरेश वावगे, मेहकर तालुका उपप्रमुख समाधान साबळे, युवा सेना ता. प्रमुख राजु बघे, निलेश देवताळू, तालुका कृषी अधिकारी जगदाने, नायब तहसीलदार हेमंत पाटील, मंड़ळ अधिकारी दिक्षीत, तलाठी सागर हुगे, खरात, शारदा पवा , कृषी सहाय्यक मोरे, गवई यांचेसह शिवसेना पदाधिकारी कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!