MEHAKAR

घरासमोर उभी सायकल चोरट्याने चोरली

मेहकर (रवींद्र सुरूशे) – देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे १५ मार्चच्या मध्यरात्री सुवर्णमाला पतसंस्थेच्या बाजूला असलेल्या भानुदास बळवंत गिर्‍हे यांच्या घरासमोर असलेली सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, याचे फुटेजसुद्धा समोर आले आहे. परंतु हा अज्ञात चोर कोण? हे शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भानुदास गिरे हे सकाळी उठल्यानंतर त्यांनी पाहिले तर घरासमोरील सायकल गायब होती. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. परंतु त्यांना आपली सायकल दिसली नाही. त्यानंतर बाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अज्ञात चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटना लिहीपर्यंत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!