कर्जत (प्रतिनिधी) – जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासकीय कर्मचार्यांच्या राज्यव्यापी संपात कर्जत तालुक्यातील बहुतांश सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. संपात सहभागी असलेले अनेक कर्मचारी आज नगर येथील आंदोलनात सहभागी झाले होते, तर कर्जतमध्ये असलेल्या स्त्री व पुरुष कर्मचार्यांनी कर्जत शहरातून मोर्चा काढला. विविध यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या.
कर्जत पंचायत समिती अंतर्गत चार गटाचे ११५१ पदे मंजूर असून, यापैकी ९८५ पदे भरलेली आहेत. यापैकी ८३७ कर्मचारी संपात सहभागी झाले असून, २६ कर्मचारी रजेवर आहेत. तर १२२ कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याची माहिती गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी दिली. तहसीलदार यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने तालुक्यातील इतर विभागाची माहिती मिळू शकली नाही. तरीदेखील सरकारी कर्मचार्यांच्या संपास तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले.
——————