कर्जत (प्रतिनिधी) – राशीन येथील ईदगाह मैदान पवित्रस्थळातून अनधिकृतपणे काढलेली दूषित दुर्गंधीयुक्त गटारीचे पाणी बारामती – अमरापूर रस्त्याच्या नवीन झालेल्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडावे या मागणीसाठी राशीन व परिसरातील मुस्लिम समाजाच्यावतीने उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत येथे आमरण उपोषण केले.
या उपोषणात शोएब काझी, जावेद काझी, जमीर काझी, राजूभाई शेख जब्बार बागवान इकबाल शेख, अफजल तांबोली, वसीम तांबोळी, अशरफ तांबोळी, रियाज भाई भोले, शकीलभाई शेख , मोहम्मदभाई काझी, साहिल शेख, व इतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने बसले होते. यावेळी ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद-उल- मुस्लिमीन, रज्जाकभाई झारेकरी जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक, वंचित बहुजन आघाडी, जनसेवा फाउंडेशन जेष्ठ नागरिक सेवा संघ कर्जत, या पक्ष व संघटनांनी, उपोषणास पत्र देऊन पाठिंबा दर्शविला, रात्री ९ वा. सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता प्रशांत वाकचौरे, सहा. गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, राशिनच्या सरपंच नीलम साळवे, ग्रामविकास अधिकारी गुरव व ग्राम विकास अधिकारी विजयकुमार बनाते, अल्लाउद्दीन काझी यांच्या उपस्थितीत राशीन ईदगाह मैदान जागेतील गटारीच्या पाण्याबाबत सकारात्मक लेखी पत्र व तोंडी आश्वासन सर्व उपस्थित अधिकार्यांनी व मान्यवरांनी दिल्यामुळे मुस्लिम समाजाचे हे उपोषण मागे घेण्यात आले.