सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी सूर्यवंशी तर सरचिटणीसपदी टेके
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ माळशिरस तालुका कार्यकारिणीची निवड पंचायत समिती माळशिरस येथे झाली. त्यामध्ये पांडुरंग सूर्यवंशी यांची माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणून तर आनंद टेके यांची सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता बाबर व महाराष्ट्र राज्य प्रशासन अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा पंचायत समिती माळशिरसचे तत्कालीन सेवानिवृत्त सहाय्यक प्रशासन अधिकारी अजितकुमार देशपांडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी भारत कदम, कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्र बुगड, परिचर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश मालखरे, तसेच कर्मचारी महासंघाचे विभागीय सहसचिव दिनेश बनसोडे, जिल्हा अध्यक्ष राजेश देशपांडे, लिपीक वर्गीय संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश गोडसे, कर्मचारी महासंघाचे मानद जिल्हा अध्यक्ष सचिन सोनकांबळे, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद साठे, जिल्हा सल्लागार हनुमंत भोसले, पंढरपूर तालुका अध्यक्ष धन्यकुमार काळे, कुर्डुवाडी तालुका अध्यक्ष येळे, माळशिरस तालुका अध्यक्ष राजाभाऊ राऊत आदी उपस्थित होते.