बुलढाणा जिल्ह्यात २८ अंगणवाडी सेविका, मदतनीस ठरल्या उत्कृष्ट कामाच्या मानकरी!
बुलढाणा (संजय निकाळजे) – आपण केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती ही कधी ना कधी मिळतच असते. ‘आई’ पहिला गुरु जरी असली तरी शैक्षणिक जीवन हे पूर्वीची बालवाडी व आत्ताची अंगणवाडीपासून सुरू होते. त्यातूनच शिक्षण व व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. आणि, हे बाल्यावस्थेतील ‘वळण’ अंगणवाडीताई व मदतनीसताई लावत असतात. अंगणवाडी केंद्रात असताना स्वतःच्या मुलासारखा सांभाळ करून त्यांची जबाबदारी त्या उत्कृष्टपणे सांभाळतात. त्यामुळे आयुष्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या कामाचे ‘फळ’ केव्हातरी मिळत असते. अशाच उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या जिल्ह्यातील १४ सेविका व १४ मदतनीस ताईंना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून आदर्श पुरस्कार जाहीर झाले आहेत. आणि, या पुरस्काराचे वितरण जागतिक महिलादिनी बुधवार ८ मार्चरोजी बुलढाणा येथे होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून दरवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आदर्श अंगणवाडी सेविका/ मदतनीस पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याहीवर्षी हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून बुलढाणा प्रकल्पांतर्गत सोनाली अशोक सुरडकर सेविका धामणगाव क्रमांक ३, मीना अनिल देवकर मदतनीस धामणगाव क्रमांक ३, चिखली प्रकल्पांतर्गत सुरेखा साहेबराव तळेकर सेविका मालगणी क्रमांक १, सुनिता दामोदर भोपळे मदतनीस मेरा खुर्द क्रमांक ८, सिंदखेडराजा प्रकल्पांतर्गत दुर्गा लक्ष्मण तांगडे सेविका राजेगाव क्रमांक २, सविता पांडुरंग सोळंकी मदतनीस ढोरवी, देऊळगाव राजा प्रकल्पांतर्गत वैशाली नामदेव खरात सेविका आळंद क्रमांक २, शालिनी संतोष गवंड मदतनीस बायगाव खुर्द, लोणार प्रकल्पांतर्गत आम्रपाली समाधान मोरे सेविका वझर आघाव क्रमांक ३, कावेरी रामेश्वर आघाव मदतनीस क्रमांक ३, मेहकर क्रमांक १ मधून- संगीता गजानन मोरे सेविका विवेकानंद नगर, अहिल्या विजय भाकडे मदतनीस कळमेश्वर क्रमांक २, मेहकर क्रमांक २- मंगला अशोक हरमकर सेविका वरवंड, प्रीती उमेश सुर्वे मदतनीस पांगरखेड, खामगाव प्रकल्पांतर्गत रेखा निवृत्ती काळे सेविका वाडी क्रमांक २, गंगा संदीप ठाकरे मदतनीस पिंपरी गवळी क्रमांक ३, शेगाव प्रकल्पांतर्गत जिजाबाई शिवराम भोजने सेविका वरुड, लता हिरामण आवळे मदतनीस वरुड, मोताळा प्रकल्पांतर्गत निवेदिता प्रवीण ताटे सेविका निपाणा, निर्मला बंडू चौधरी मदतनीस निपाणा, मलकापूर प्रकल्पांतर्गत ज्योत्स्ना संतोष आढाव सेविका लासुरा क्रमांक २, कल्पना संतोष बावस्कर मदतनीस वरखेड क्रमांक २, नांदुरा प्रकल्पांतर्गत गीता शालिग्राम नावकार सेविका मोमीनाबाद क्रमांक २, शीतल प्रशांत डोळसकर मदतनीस निमगाव क्रमांक ६, जळगाव जामोद प्रकल्पांतर्गत छाया प्रशांत तायडे सेविका झाडेगाव क्रमांक २, सुजाता दीपक पहुरकर मदतनीस खांडवी क्रमांक २, संग्रामपूर प्रकल्प अंतर्गत केशर विठ्ठल कोकाटे सेविका एकलारा क्रमांक १, रत्ना लक्ष्मण अस्वार मदतनीस एकलारा क्रमांक १ आदींचा समावेश आहे.
उपरोक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जागतिक महिलादिनी बुधवार ८ मार्च रोजी बुलढाणा येथे एका भरगच्च कार्यक्रमात आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस पुरस्काराचे वितरण अधिकारी-पदाधिकारी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. सध्याच्या या काळामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलादेखील प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. कामाची चुणूक दाखवून आपल्या विभागामध्ये उत्कृष्ट कामगिरी राबविण्यात त्यादेखील तरबेज झाल्या असून, त्याचेच हे फलित आहे, एवढे मात्र निश्चित..!