सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – भारत सरकारच्या केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्यावतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद व भारतीय कृषी संशोधन संस्था यांच्यातर्पेâ देण्यात येणारा ‘राष्ट्रीय नाविण्यपूर्ण शेतकरी पुरस्कार- २०२३’ हा पुरस्कार कृषिभूषण अंकुश पडवळे (मंगळवेढा जि, सोलापूर) यांना केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैशास चोधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दरवर्षी असे पुरस्कार देशभरातील नाविण्यपूर्ण व शेतकर्यांना दिशादर्शक काम करणार्या शेतकर्यांना देण्यात येतो. कृषि विज्ञान मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळ्यात पडवळे यांना सदर पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सन्मानपत्र व सन्माचिन्ह देण्यात आले. यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांश पाठक, भारतीय कृषी विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंग, सहसंचालक डॉ. रविंद्र पहडिया आदी व्यासपीठावरा उपस्थित होते. पडवळे यांना केंद्र सरकार, राज्य सरकार व विविध स्वयंसेवी संस्था कडून विविध पुरस्काराने यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे. पडवळे हे गटशेती, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकर्यांना सतत मार्गदर्शन व सहकार्य करीत असतात. तसेच शेतकर्यांचे अनेक प्रश्न ते केंद्र व राज्य सरकार यांच्या कडे अभ्यासपूर्ण पणे मांडतात. त्यांच्या या कामाचीच दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना हा राष्ट्रीय कृषी पुरस्कार प्रदान केला आहे.