मा. माधवराव आरसोडे साहेब यांचा आज वाढदिवस… हिवरा खुर्दच्या भूमीत, लहान खेड्यात जन्मलेले एक रत्न भाऊंच्या माध्यमातून समाजाची निस्वार्थपणे सेवा करण्यास सज्ज आहे, जीवनाच्या पटलावर अनेक संघर्षातून उदयास आलेल व्यक्तिमत्व, समाजाची जाण ठेवत, सेवा करण्यास सज्ज आहे, त्यांच्या अडी-अडचणीतून मार्ग काढीत समाजासाठी तारणहार म्हणून उभे आहेत, समाजाच्या विविध क्षेत्रात ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, किंव्वा आर्थिक क्षेत्र असो सर्व क्षेत्रात आपली पकड अतिशय मजबूत केली आहे.
२६ जानेवारी १९९७ साली संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था जानेफळ येथे स्थापन करून त्याचा विस्तार करीत हिवराखुर्द, नायगाव दत्तापूर, कळमेश्वर शाखेच्या माध्यमातून समाजाच्या अनेक समस्या सोडवण्यास कटिबद्ध आहेत. गोदामच्या माध्यमातून शेतकर्यांचे धान्य सुरक्षित ठेवून त्यांना गरजे पुरती रक्कम देऊन महत्वाचे काम भागून शेतातील धान्य मालाला योग्य भाव आल्यानंतर विकून शेतकर्याचे खर्या अर्थाने कल्याण करण्याचा वसा घेतलेले भाऊ सर्वांच्या मनात घर करून आहे, तसेच शैक्षणिक क्षेत्रात आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न सत्यात उतरवणारे १९९८ साली जिजामाता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ हिवरा खुर्द या नावाने ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात पदार्पण करीत अतिशय उच्चप्रतीचे शिक्षण देण्यास नावलौकिक मिळवत शिक्षणाची पायामुळं घट्ट करीत जिजामाता विद्यालय, जिजामाता विद्यामंदिर, जिजामाता गुरुकुल, जिजामाता जुनिअर कॉलेज अशा विविध शैक्षणिक क्षेत्रात उज्वल क्रांती बदल घडवीत, जिजामाता विद्यालय तर समाजाच्या मनातील ताईत बनले आहे. याचीच प्रचिती म्हणजे ग्रामीण भागातील या शाळेत आजरोजी एकूण १९०० च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की इतर शाळांना अॅडमिशनसाठी दारोदार फिरावं लागतं. इथे अॅडमिशन तारखे अगोदरच फुल होऊन जातात. बुलढाणा जिल्ह्यात प्रसिद्ध येथील गुणवत्तेचा स्तर उच्चकोटीचा आहे, खर्या अर्थानं सर्व शिक्षक मंडळी विशेष करून मुख्याध्यापक श्री संजय जारे सर आणि भाऊंच्या कुशल नेतृत्वाचे यश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते शिक्षण हे वाघिणीचं दुध आहे, जो पेईल तो गुरगूरल्या शिवाय राहणार नाही, हिच शिक्षणाची गंगोत्री भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता विद्यालयात ४६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे, अतिशय उच्च प्रकारचे शिक्षण ते विद्यार्थ्यांना देतात, शिक्षणाची गंगोत्री पुण्यात आहे, तर ग्रामीण भागाची गंगोत्री हिवरा खुर्दला आहे असे म्हणणे वावगं ठरणार नाही.
विविधतेने शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेसाठी शाळेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक सुविधा पूरविण्यात भाऊ काम करत आहे. राजकारण हे समाजाभिमुख कसं होईल यासाठी प्रयत्न करून सामाजिक सलोखा कसा निर्माण होईल, तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता कमी करण्यासाठी प्रयत्न करत, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करणारे भाऊ त्यांच्या या विशेष कार्याबद्दल त्यांना २०१५ मध्ये विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे…. स्वतः शिक्षित असून पत्नी दोन्ही मुले उच्चशिक्षित आहेत आणि समाजाची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत.