– चार वर्षांपासून पसार झालेल्या आरोपीस जानेफळ पोलिसांनी केले जेरबंद
मेहकर (अनिल मंजुळकर) – बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या आदेशाने पसार झालेल्या आरोपी शोध मोहिमेअंतर्गत आज जानेफळ परिसरात ३९५, ४२०,१२०(ब) भादंविच्या कलमानुसार दाखल गुन्ह्यांतील पसार झालेला आरोपी रामेश्वर उर्फ रामा किरीम पवार रा. जानेफळ ता. मेहकर याला जानेफळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले. या आरोपीबाबत खबरीने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे मज्जिद चौक जानेफळ या ठिकाणी तो आल्याची माहिती मिळाली, या माहितीच्या आधारे जानेफळ पोलीस स्टेशनचे नवीन ठाणेदार एपीआय प्रवीण मानकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप सावले, पो हे कॉ. अरविंद चव्हाण, पो. कॉ. शेख इसाक, पोकॉ. विष्णू जगताप, पो.कॉ. विष्णू निकम पो.कॉ. अमोल अंभोरे, मपोका नीता शिंदे, एएसआय मोरे यांनी पाळत ठेवून पाठलाग केला असता, सदर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला जेरबंद करण्यात आले.
या कारवाईदरम्यान पोलीसांचा दोन वाहनांसह आरोपीला ताब्यात घेण्यासाठी झालेला थरार पाहून ठाणेदार प्रविण मानकर यांच्या कार्यशैलीचे कौतुक जानेफळात पाहायला मिळाले. सदर कारवाही जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार त्यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, जानेफळ पोलीस स्टेशनला नव्याने आलेले ठाणेदार एपीआय प्रवीण मानकर, पीएसआय संदीप सावले आणि जानेफळ पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जानेफळातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणेदार प्रविण मानकर अॅक्शन मोडवर दिसून येत आहेत.