आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्रीक्षेत्र आळंदी-पिंपळनेर श्रीगुरू हैबतरावबाबा पायी दिंडीचे स्वागत पिंपळनेर (ता.पारनेर) येथे हरीनाम गजरात झाले. संत निळोबाराय महाराज पुण्यतिथी दिनी आळंदी मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार, आळंदी संस्थांनचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते श्रींचे समाधीची महापूजा झाली. उद्या (दि.२३ ) गुरुवारी शासकीय महापूजा, काल्याचे कीर्तन, महाप्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता होईल.
आळंदी मंदिरातून श्री गुरु हैबतरावबाबा यांचे विना दिंडीने पिंपळनेर वारीचा प्रवास दिंडीने हरिनाम गजरात पूर्ण केला. दिंडीचे आळंदीहून पिंपळनेर येथे हरीनाम गजरात आगमन होताच परंपरेने स्वागत करण्यात आले. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर,स्वामी सुभाष महाराज, जनार्धन महाराज, हैबतरावबाबा दिंडीतील वारकरी, भाविक उपस्थित होते. आळंदी देवस्थानच्या हैबतरावबाबा दिडीचे आगमन होताच पिंपळनेर देवस्थान आणि सेवा मंडळ तसेच ग्रामस्थांनी स्वागत केले. जणू माउलीच संत निळोबाराय उत्सवास हजर राहिल्याचा भाव जपत श्रीचे दिंडीचे स्वागत झाले. संत परंपरेतील संत निळोबाराय हे शेवटचे संत आहेत. त्यांची श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे समाधी आहे. येथे वार्षिक पिंपळनेर वारी भरते. लाखो वारकरी या यात्रेस हरीनाम गजर करीत दिड्या-दिंड्यातून उपस्थित होते.
संत निळोबाराय उत्सवा निमित्त श्रीचे समाधीची पूजा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते झाली. यावेळी आळंदी संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विश्वस्त अनिल वडगावकर, उद्योजक आनंद वडगावकर, विश्वस्त स्वामी सुभाष महाराज, तुकाराम शिंदे, जनार्धन महाराज, मनोहर अवचट, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, मकाशे महाराज , आपटे गुरुजी यांचेसह श्रीगुरू हैबतरावबाबा दिंडीतील प्रमुख वारकरी, दिंडीकरी उपस्थित होते. श्री संत निळोबाराय समाधी पूजा वेदमंत्र जयघोषात झाली. परंपरेने हैबतराव फडाचे वतीने कीर्तनकार बंडा महाराज यांनी कीर्तन सेवा रुजू केली. संत निळोबाराय देवस्थान आणि सेवा मंडळ,ग्रामस्त यांचे वतीने वारकरी-भाविक यांना महाप्रसाद आणि पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.पुणे, नगर, नासिक, सोलापूर जिल्हा परिसरातून मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले.
शासकीय महापूजा, काल्याचे कीर्तन संत निळोबाराय यात्रेत उद्या गुरुवारी होणार आहे. नगरचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक मान्यवर यासाठी उपस्थित राहणार आहेत. काल्याचे कीर्तन सेवा झाल्या नंतर महाप्रसाद होणार आहे. या यात्रेत भाविकांना विविध सेवा सुविधा उपलब्द्ध करून देण्यात आल्याने वारकरी- भाविकांची सोय झाली. यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. पिंपळनेर -आळंदी पायी वीणा दिंडी सोहळ्याची सांगता आळंदी मंदिरात होणार असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार यांनी दिली. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विशेष सहकार्य आणि ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील परंपरांचे पालन करीत श्री गुरु हैबतरावबाबा वीणा दिंडी चे आयोजन पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब महाराज आरफळकर पवार यांचे नियंत्रणात करण्यात आले आहे.