मेहकर (रवींद्र सुरूशे) – मेहकर, लोणार तालुक्यातील अनेक चोर्यांच्या प्रकरणातील सहा आरोपींना मेहकर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना न्यायालयासमोर सादर केले असता मेहकर न्यायालयाने आरोपींना १६ फेब्रुवारी रोजी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मेहकर शहर व तालुक्यातील आणि लोणार तालुक्यातील अनेक चोर्यांच्या घटनेत पोलिसांना हव्या असलेल्या संशयित सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये पवन सुरेश पवार राहणार वडद जिल्हा यवतमाळ, मिथुन उर्फ काळ्या बटकू चव्हाण राहणार पांगरखेड वाशीम, श्रीकांत राजेश चव्हाण राहणार सावरगाव बरडे जिल्हा वाशीम, लक्ष्मण मधुकर चव्हाण राहणार पांगरखेड अधिक दोन यांचा समावेश आहे. मेहकर व शिरपूर जैन पोलिसांनी केलेल्या संयुक्त शोधमोहिमेत या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. काही चोर्यांची आरोपींनी कबुली दिली असली तरी त्यांच्याकडून अनेक चोर्यांची माहिती उघड होऊ शकते, असा अंदाज आहे. ठाणेदार निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरकुमार नागरे,ए पी आय जायभाये आणि त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.