ChikhaliVidharbha

रविकांत तुपकर यांच्यासह शेतकर्‍यावर दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्या!

मेरा बुद्रूक (कैलास आंधळे) – चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आज, दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री यांना तहसीलदार चिखली यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. शेतकर्‍याच्या पीकविम्याच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेतकर्‍यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करत असतांना, पोलीस प्रशासनाने तुपकर व सहकारी शेतकर्‍यांवर वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले व शेतकरीहिताचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे चिखली तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये शासनाप्रति प्रचंड रोष व्यक्त होत आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून शेतकरी नेते रविकांत तुपकर व सहकारी शेतकर्‍यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे तसेच सर्व शेतकर्‍यांना अतिवृष्टीची मदत देण्यात यावी, पिकविम्याची रक्कम देण्यात प्रचंड तफावत होत आहे, ती रक्कम सुध्दा समप्रमाणात मिळाली पाहिजे, अन्यथा चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिखली तालुकाअध्यक्ष दीपक मस्के,प्रमोद पाटील विधानसभा अध्यक्ष रवी तोडकर, शहराध्यक्ष शारिक शेख,दीपक शिंगणे,राजू म्हस्के,प्रवीण कांबळे सुनील सुरडकर,भिकाभाऊ खेडेकर,सतीश बाहेकर,नंदू अंभोरे,भगवानराव काळे,संजय खेडेकर,सागर खरात,पुरुषोत्तम हाडे,सदानंद मोरगंजे,राजू इंगळे, उपसरपंच प्रमोद चिचोंले,दिगंबर चोथे,शिवसिंग इंगळे,नारायण इंगळे,विशाल सपकाळ,अक्षय सपकाळ,प्रकाश धुरंधर,दगडू शिंदे,सुभाष हलकरे,विद्याधर पवार इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!