कर्जत (प्रतिनिधी) – गांव विकासासाठी फक्त बांधकामे करने आवश्यक नाही तर शाश्वत विकासासाठी सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची गरज असल्याचे मत राजस्थान मधील पिपलांत्रीचे आदर्श सरपंच पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांनी व्यक्त केले.
कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने समृद्ध गांव व मतदार संघातील विकासाची पाहनी करण्यासाठी व येथील पदाधिकार्याना मार्गदर्शन करण्यासाठी राजस्थान मधील पिपलांत्रीचे आदर्श सरपंच पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांना आ. रोहित पवार व त्याच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी निमंत्रित केले होते. दि १४ फेब्रू रोजी त्याच्या कर्जत जामखेड़ मतदार संघाच्या दौऱ्यात बेनवडी गावाला भेट दिली व गावाची पाहणी करत सरपंच व ग्रामस्थांना मौलिक सल्ला दिला. बेनवड़ी ग्राम पंचायतने ३ हजार झाड़े रोजगार हमी व ग्रामस्थाच्या श्रमदानातून लावलेली असून या झाड़ांची निगा राखण्यासाठी अकरा महिला दररोज काम करत आहेत हे पाहुन पद्मश्री पालीवाल यांनी या महिलांचा फेटा बांधून सत्कार केला. तर त्याच्या हस्ते बेनवड़ी येथे वृक्षारोपण ही करण्यात आले. यावेळी पालीवाल यांनी गांव विकासाच्या अनेक संकल्पना विषद करताना फक्त गावातील बांधकामावरच फक्त लक्ष न देता गावात चांगली शेती असावी, चांगल्या जातीचे जनावरे असावीत, गावातील प्रत्येक नागरीकाना योग्य प्रकार चा रोजगार असावा, चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे याशिवाय विविध गरजाची पूर्तता व्हावी नागरिक सुखी समाधानी असावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना ग्रामस्थ निवडनुकीच्या वेळी कसे वागतात त्यावर त्या गावचा कारभार कसा चालनार आहे हे ठरते गावातील नागरिकानी लोक नियुक्त लोक प्रतिनिधिना सहकार्य केले पाहिजे व त्याच्या वर नियंत्रण ही ठेवले पाहिजे असे म्हटले. यावेळी सरपंच पोपटराव धुमाळ यांनी गावात सुरु असलेल्या कामाची माहिती देऊन स्वागत केले.
यानंतर पद्मश्री पालीवाल यांनी धुमाळ फार्मला भेट देताना माळरानावर पिकवलेली द्राक्ष शेती, यासाठी उभारलेला भव्य शेत तलाव पाहून आनंद व्यक्त करत सरपंच जर शेतकरी असेल व त्याने जिद्द, चिकाटीने कष्ट घेतले तर काय होऊ शकते हे याठिकाणी पहावयास मिळाले असल्याचे म्हटले. कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने समृद्ध गांव मध्ये सहभागी कर्जत जामखेड़ तालुक्यातील सरपंचाची राजस्थान मध्ये अभ्यास सहल काढली होती. आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या बरोबर या सर्व सरपंचानी राजस्थान मधील पिपलांत्री गावास भेट देऊन पाहनी केली होती व सर्वानी आदर्श सरपंच पद्मश्री श्यामसुंदर पालीवाल यांना महाराष्ट्राला भेट देऊन कर्जत जामखेड़ मध्ये येण्याची विनंती केली होती. ज्यांनी आपलं गाव देशातच नव्हे तर जगभरात त्याची ख्याती निर्माण केली व गावाचा सर्वांगीण विकास केला व या कामामुळे त्याना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले असे सरपंच पालीवाल यांनी कर्जत जामखेड़ तालुक्याला भेट देत आ.रोहित पवार व त्याच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या कार्याचे कौतुक करत आमच्या भागाला त्याचे मार्गदर्शन लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सरपंच पोपटराव धुमाळ, उपसरपंच शिल्पा विश्वास डमरे, ग्रा. पं. सदस्य सचिन खुडे, मछिंद्र गायकवाड़, विश्वास डमरे, महादेव बालू गदादे, औदुंबर भोसले, गुलाब क्षीरसागर, खंडू गदादे, बालू लक्ष्मण गदादे, आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. तर
कर्जत जामखेड़ एकात्मिक संस्थेचे सचिन खलाटे, अजीत पवार, समृद्ध गावचे समन्वयक अमोल गायकवाड, आदींनी त्याचे बरोबर ग्रामस्थाच्या कामाची पाहनी केली व उत्कृष्ट कामाचे कौतुक केले.