BULDHANAMEHAKARVidharbha

अंबेवाडी फाट्यावर भीषण अपघात, दोन युवक ठार

साखरखेर्डा (डॉ. गंगाराम उबाळे) – मलकापूर पांग्रा ते साखरखेर्डा रोडवरील अंबेवाडी फाट्याजवळ भरधाव टिप्परने दुचाकीस्वारास उडविल्याने झालेल्या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार, तर दुसरा अपचारादरम्यान मृत्युमुखी पडला आहे. घटनेनंतर टिप्परचालक घटनास्थळाहून पळून गेला होता. परंतु, पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे.

अंबेवाडी फाट्याजवळून जात असताना भरधाव टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी १२९९ ने दुचाकीस्वार अमोल शिवाजी खोडके (वय २६) व ओम गैभी खोडके (वय २४) रा. शेंदुर्जन, ता. सिंदखेडराजा यांना जोराची धडक देऊन उडविले. या भीषण अपघातात अमोल खोडके हा जागीच ठार झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळाहून पळून गेला. अपघातग्रस्त युवकांना ग्रामस्थांनी तातडीने मदत केली. तसेच, साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार काळे व कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले. परंतु, अमोल हा जागीच ठार झाला होता. तर दुसर्‍या युवकास तातडीने दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु, नंतर त्याचीदेखील उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. पळून गेलेला आरोपी हा साखरखेर्डा पोलिस ठाण्यात हजर झाल्याने, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निवृत्ती पोफळे हे करत आहेत. या दुर्देवी घटनेने शेंदूरजन गावावर शोककळा पसरली आहे.

———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!