कर्जत (प्रतिनिधी) – कुंभेफळ गावाला गेल्या तीन वर्षांत कुठल्याही प्रकारचा मोठा निधी उपलब्ध होत नसल्याने , विकास कामे ठप्प झाली होती. ग्रामपंचायत मार्फत केल्या जाणाऱ्या कामा व्यतिरिक्त कुठल्याही विभागाचा निधी मंजूर होत नसल्याने विविध विकास योजनांची कामे रखडली होती. मात्र प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषद सदस्यपदी निवड झाली, आणि सरकार मध्ये बदल होताच डॉ सुजयदादा विखे पाटील व आमदार राम शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जलजिवन मिशन सारख्या योजने अंतर्गत कोटी रुपये निधी उपलब्ध झाला. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने खासदार डॉ. सुजय विखे व आमदार प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
कर्जत -कुंभेफळ- अळसुंदे रोड साठी सहा कोटी रुपये तर गेल्या आठ दिवसापूर्वी २५/१५ अंतर्गत सिमेंट काॅंक्रेटीकरणा साठी दहा लाख रुपये निधी मंजूर केला आहे. एकुणच गेल्या तीन वर्षापासून ठप्प झालेल्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाल्याचे पहावयास मिळत असल्याने समस्त ग्रामस्थांच्या वतीने खासदार डॉ. सुजय विखे व आमदार प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. व जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या योजनेचा लोकार्पण सोहळ्यानिमित्त या दोन्ही नेत्यांना निमंत्रण दिले. लवकरच हा लोकार्पण सोहळा होऊन ही योजना लोकार्पीत केली जानार आहे. त्याच बरोबर गावच्या विकासासाठी इतर विविध योजना राबविण्यात याव्यात, अशी विनंती ही केली. या वेळी डॉ. सुजय विखे, व आमदार प्रा. राम शिंदे यांनी गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित केले.
या सत्कार समारंभासाठी, अनिल पाटील, राजेश धोदाड, सागर पाटील, महेंद्र धांडे, गणेश तोरडमल, प्रशांत पाटील, योगेश धोदाड, भैय्या पाटील, शरद धोदाड, आबासाहेब धोदाड, दत्तात्रय धोदाड, प्रशांत धोदाड, सौरभ पांडूळे, सचिन तोरडमल, आकाश धोदाड, रामधन धोदाड, बाल्या धोदाड, देविदास उकीरडे, सुदाम उकीरडे, सोनू शेख, सरपंच काकासाहेब धांडे, माजी उपसरपंच पप्पू शेठ धोदाड यांचे सह अनेक गावकरी व भारतीय जनता पार्टीचे सचिन पोटरे, गणेश क्षीरसागर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.