– राजमाता कॉलेनीतील नागरिकांनी मानले अशोकसेठ बढे, दत्ता सप्रे पाटील यांचे आभार!
नगर (प्रतिनिधी) – गेली तब्बल दहा वर्षे रस्त्यासाठी संघर्ष करणार्या राजमाता कॉलेनीतील रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. या प्रभागाचे नगरसेवक तथा नगरपालिकेचे सभागृह नेते अशोकसेठ बढे यांच्या नगरसेवक निधीतून या कॉलेनीतील सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले असून, तुम्हाला दर्जेदार रस्ता करून देऊ, असे आश्वासन कार्यसम्राट नगरसेवक अशोक बढे यांनी कॉलेनीवासीयांना दिले आहे. नगरचे माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांनी या कॉलेनीतील रस्त्यासाठी आश्वासन दिले होते. नगरसेवक बढे यांनी एकप्रकारे अनिलभैय्या यांचे स्वप्नच साकार केले आहे.
नागापूर पुलाजवळ असलेली या कॉलेनीत सर्व सुशिक्षीत व शांतताप्रिय नागरिक राहतात. या कॉलेनीतील घरांचे थातुरमातूर बांधकाम करून व घरे हस्तांतरित करून बिल्डर पळून गेला होता. त्याने कॉलेनीत कोणतीही विकासकामे केली नव्हती. रस्ता, वीज, ड्रेनेज या सुविधादेखील त्याने दिल्या नव्हत्या. परंतु, कॉलेनीतील सर्व सदस्यांनी पदरचे पैसे खर्च करून मूलभूत सुविधा करून घेतल्या होत्या. या कॉलेनीत रस्ता करून द्यावा, यासाठी कॉलेनीतील सर्व रहिवाशांनी नगरचे तत्कालिन आमदार अनिलभैय्या राठोड, विद्यमान आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
अखेर सभागृह नेते तथा नगरसेवक अशोकसेठ बढे व दत्ता सप्रे पाटील यांनी याप्रश्नी लक्ष घालून स्थानिक नगरसेवक निधीतून राजमाता कॉलेनीसाठी सिमेंट रस्ता मंजूर करून घेतला व काल त्याचे कामदेखील सुरू केले आहे. या रस्त्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे व दर्जेदारपणे करून देऊ, असे आश्वासन नगरसेवक अशोकसेठ बढे व दत्ता सप्रे पाटील यांनी दिले आहे. हा रस्ता मंजूर केल्याबद्दल कॉलेनीतील रहिवासी यांनी सभागृह नेते तथा नगरसेवक अशोकसेठ बढे यांचा सत्कार केला. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष संजय उमाप, ज्येष्ठ संपादक व पत्रकार पुरुषोत्तम सांगळे, मनोज लाटे, संघर्ष साळवे, बाळासाहेब चोथे, विजय साठे, सागर भिसे, दीपक बाकले, राजू नारखेडे, दिलीप लेकुरवाळे, श्यामराव पवार, प्रकाश दिवे, महेश नारखेडे, कदम सर, मोहिते साहेब, अमोल कणसे, सोनवणे साहेब, मोहसीन शेख, दिलीप दरंदले, गणेश छिंदम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.