साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे देण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 41 दिवसाच्या ट्रेनिंग साठी मसूरी येथे जात आहेत. येत्या सोमवारपासून सीईओ पदाचा कारभार अतिरिक्त सिईओ संदिप कोहिनकर हे पाहणार आहेत.
सीईओ यांचे दालनात आज मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे कडे सीईओ पदाचा पदभार दिला. पुष्पगुच्छ देऊन सिईओ स्वामी यांनी प्रभारी सिईओ कोहिनकर यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रशासन व ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे प्रमुख उपस्थित होते. 2 जानेवारी 2023 रोजी संदीप कोहीनकर यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. आपल्या दीड महिन्याच्या कालावधीत त्यांना सीईओ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मी परत येणार – सीईओ स्वामी
येत्या २४ मार्च रोजी परत जिल्हा परिषदे मध्ये येणार आहे. ३१ मार्च चे आत सर्व कामांचा निपटारा करा. नाविन्य पुर्ण योजनांचे सातत्य राखा. जलजीवन मिशन ची कामे तसेच निधी कुठलाही अखर्चित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या असल्याचे त्यांनी पत्रकारांची बोलताना सांगितले.