अकोट, जि. अकोला (तालुका प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्गाच्या रहिवासी वसतीच्या दोन्ही बाजूने नाली बांधकाम करून द्या, नाहीतर तीव्र आंदोलन करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अकोट शहर उपाध्यक्ष तथा समाजसेवक लखन इंगळे यांनी निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता अकोला यांना दिला आहे.
याबाबत कार्यकारी अभियंत्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाअध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, माजी जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे, तालुका अध्यक्ष चरण इंगळे, शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ, माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे, माजी उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे, वरिष्ठ नेते सुनील अंबळकार यांची उपस्थिती होती.
गोरगरीब व सामान्य लोकांसाठी सक्रिय असलेले समाजसेवक लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला क्र.५४८ यांना निवेदन दिले. निवेदनात मागणी अशी होती की, आकोट-अंजनगावरोड पुला समोरून अकोला नॅशनल हायवे असून, काही वर्षे पूर्वी एम.एस.खुरान इंजिनियरिंग लिमिटेड व के.अँड.जे.प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांनी आकोट-अंजनगावरोडचे काम केले आहे. सत्तीमैदान अंजनगावरोड आकोट पुलापासून रहिवासी वस्ती लागत असून, या दोन्ही साईटने नाली बांधकाम करून दिलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात लोकांच्या घरात रोडचे पाणी जाते व त्या पाण्याचे डबके घरासमोर साचते. त्यामुळे त्यांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण होत आहे. करीता दोन्ही बाजूने नाली बांधकाम करून देण्यात यावे, नाहीतर आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असा लखन इंगळे यांनी संबंधित अधिकारी यांना इशारा दिला आहे. निवेदनावर नितीन तेलगोटे, राजु भोंडे, नवनीत तेलगोटे, प्रतीक तेलगोटे, सुगत तेलगोटे, विशाल पडघामोल, रामेश्वर दाभाडे यांच्या सह्या आहेत.
—————