– मोलमजुरी करणार्या आईचा पोलिस दरबारी हंबरडा
पैठण (प्रतिनिधी) – चिकलठाणा हद्दीत गंगापूर जहागीर शेंद्रा एमआयडीसी लगत उदार निर्वाहासाठी चार ते पाच वर्षांपूर्वी आलेले अंबड तालुक्यातील कुटुंब वास्तव्यास असून, मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते. त्यामध्ये अल्पवयीन मुलगी एक भाऊ व आई पतीपासून अलग राहत आहे. त्यामध्येच दुःखाची भर म्हणून अल्पवयीन मुलीला बाहेरून कामासाठी आलेल्या परिवाराने संगनमताने फूस लावून अज्ञात ठिकाणी पळून नेले आहे. त्यामुळे या दुर्देवी आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिने चिकलठाणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, तपास शून्य असून, उलट पोलिस तिला उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पिटाळून लावत आहेत.
सविस्तर असे, की पीडित आई ही उदर निर्वाहासाठी बाहेर गावाहून आलेली असून गंगापूर जहागीर येथे वास्तव्यास आहे.दि. २/ ३/२०२२ रोजी ही घटना घडली आहे. ३/३/२०२२ रोजी मुलीच्या आईने पोलीस ठाणे चिकलठाणा येथे प्रत्यक्ष जाऊन तक्रार दिली. मुलीची आई ही शेंद्रा एमआयडीसी येथे खाजगी नोकरी करून उदरनिर्वाह करते. मुलगी ही नाबालिक असून जुन्नेश्वर महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वरुड येथे शिक्षण घेत होती. दिनांक २ /३ / २०२२ रोजी रात्री ११.३० वाजता राहते घरी गंगापूर जाहागीर येथील जेवण करून झोपी गेली होती. सकाळी सहा वाजे दरम्यान मुलगी बाथरूमसाठी उठली असताना अचानक बेपत्ता झाली असून, वय १७ वर्षे आहे. आईला जाग आल्यानंतर मुलगी दिसली नाही म्हणून इतरत्र शोध घेऊनही मुलगी आढळली नाही. मुलीच्या आईने लगेच भावाला फोन करून बोलावून घेतले, वरुड काजी येथील त्यांचे भाऊ दोन ते पाच मिनिटात गंगापूर जहागीर येथे पोहोचले. मुलीचा शोध घेतला असताना मुलगी कुठेही आढळून आली नाही, मुलीच्या आईला अशी माहिती पडले की सकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर राहणारा गणेश आसाराम टाकसाळ हा त्या मुलीला पंधरा दिवसापासून माझ्यासोबत पळून चल असे म्हणून सारखा छळत असे. मुलीने मुलीच्या आईला वारंवार सांगितले ही होते. तेव्हा मुलीच्या आईने ‘गणेश आसाराम टाकसाळ’ यास वारंवार माझ्या मुलीला त्रास देऊ नकोस म्हणून समजावून ही सांगितले व आम्ही मायलेकीच आहे म्हणून आम्हाला त्रास ही देऊ नको, असे समजावून सांगितले. परंतु मुलगा हा गुंड प्रवृतीचा असून मुलीला धमक्या व छेडछाड चालूच होती. पीडित मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार माझ्या मुलीला गणेश आसाराम टाकसाळ व त्यांच्या कुटुंबीयांनीच तिला पळवून नेले आहे. माझ्या मुलीचा शोध घेऊन मला माझी मुलगी द्यावी व गणेश आसाराम टाकसाळ व त्यांच्या कुटुंबीयांवर कायदेशीर कार्यवाही करावी, म्हणून मुलीच्या आईने चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज ही केला. भादंविच्या १८६० नुसार ३६३ कलमान्वये गुन्हा दाखलही केलेला आहे. परंतु आज रोजी तीन ते साडेतीन महिने उलटूनही चिकलठाणा पोलिस स्टेशनकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसून, मुला-मुलीचा कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता लागला नाही. चौकशी केली असता पोलिस टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तक्रारदारास म्हणतात, तुम्ही शोध घ्या व आम्हाला सांगा. आम्ही पकडून आणू, अशी सविस्तर माहिती मुलीच्या आईने आमच्या प्रतिनिधीस दिली आहे व एफआयआरची नोंद ही आहे.
Leave a Reply