MaharashtraVidharbhaWomen's World

यामिनी दळवी यांना ‘नवोन्मेषी’ पुरस्कार प्रदान

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. रवी कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे ह्यांना पहिला ‘पसायदान’ पुरस्कार

हिवरा आश्रम (ता. मेहकर) – १९ जून २०२२ रोजी मदत वेल्फेअर ट्रस्ट तर्फे सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी मेळघाट येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. रवी कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे ह्यांना पहिला ‘पसायदान’ पुरस्कार प्रसिद्ध लेखक आणि अक्षर मानव परिवाराचे अध्वर्यू राजन खान ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २५००० हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मदत ट्रस्ट ही तरूण मुलींची सगळ्या क्षेत्रातील उपेक्षितांना मदत करणारी सामाजिक संस्था असून आतापर्यंत त्यांनी भारतभर १००० अनाथ मुलांचे पालकत्व घेतले आहे. तर नवोदित कवयित्रीसाठी गझलकारा यामिनी दळवी ह्यांना ‘नवोन्मेषी’ पुरस्कार ज्येष्ठ गझलकार म.भा. चव्हाण ह्यांना प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी विठ्ठलराव जाधव माजी पोलिस महासंचालक कारागृह , मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, मदत वेल्फेअर ट्रस्टच्या अध्यक्षा दिपाली वारूळे तसेच मोठा चाहता वर्ग उपस्थित होता. गझल या काव्यप्रकारात अत्यंत कमीत कमी शब्दांत कवीला आपल्या तरल भावनेचा काव्याविष्कार करावा लागतो. आज गझल हा काव्यप्रकार साहित्यात अत्यंत लोकप्रिय होत चाललेला आहे. यामिनी दळवी हीच्या गझला श्रोतृगणांच्या मनाला मोहीत करीत आहे. यामिनी दळवी एक संवेदनशील, सृजनशील गझलकार असून तिच्या गझला सहज जीवनाचा गíभतार्थ सांगून जातात. यामिनी दळवी हीच्या संहिता, लेखन आणि पार्श्वध्वनी असणाऱ्या ‘मी मुंबई बोलतेय’ ह्या शो ला राष्ट्रीय पातळीवरचा ENBA पुरस्कार प्राप्त झाला आहे.याशिवाय विविध वर्तमानपत्रातून विपूल लेखन तसेच नव्या पुस्तकांवर आणि लेखकांवर लेखन केले आहे.

यामिनी दळवी हीने सेलिब्रेशन 2018 या पहिल्या डिजिटल दिवाळी अंकाची संपादनाची जबाबदारी सुध्दा तेवढयाच सक्षमपणे व समर्थपणे पार पाडली आहे. याशिवाय गोष्ट कोऱ्या कागदांची या कवितेच्या कार्यक्रमाचं लेखन आणि निर्मिती सुध्दा केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग, काव्यधारा, मुक्काम पोस्ट कविता, न्यूजलेस कविता, कविता तुमची -आमची अशा राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. अनेक चॅनलवरती कविता प्रदर्शित व गीतलेखन केले आहे. महाराष्ट्रातील अनेक जेष्ठ कवीसोबत कविता वाचनाचे राज्यभर कार्यक्रम केले आहे.

याप्रसंगी नामांकित गझलकारांचा मुशायरा संपन्न झाला. सदर मुशाय-यामधे वैभव देशमुख , गोविंद नाईक, शांताराम खामकर,विशाल कुलकर्णी तसेच यामिनी दळवी सहभागी झाले होते. गझलकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालननरेंद्र गिरीधर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!