CrimeMEHAKAR

जानेफळात रापीचा थरार; दारूची उधारी मागितली म्हणून भोसकले!

– आरोपीच्या हल्ल्यात पोलिस शिपाई चव्हाण जखमी

मेहकर (अनिल मंजुळकर) – जानेफळमधील रमाई नगर चौकमध्ये दारूची असणारी उधारी मागितली म्हणून हटकल्याच्या वादात जीवघेणा हल्ला झाल्याने जानेफळात रापीचा थरार झाल्याने गावात एकच खळबळ उडाली.

सविस्तर असे, की जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत दि. ३१ जानेवारी रोजी सौ. कांताबाई किरण महादनकर वय (४० वर्षे रा.सरस्वती जानेफळ शाळेसमोर) यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात रिपोर्ट दिला की, ३१ जानेवारी रोजी २.३० वाजता तेजस्वी संस्थांन वरोडी इथून सेवाधारी सेवा पूर्ण करून जानेफळ येथे येऊन घरी जात असतांना लहान भाऊ श्याम मुरलीधर मुरडकर (वय ३५ वर्ष) रा. जानेफळ हा रमाई नगर चौक येथे बसलेला दिसला. त्यास कांताबाई ही बोलत असतांना तिथे गावातील वार्डात राहणारा आरोपी देवलाल किसन सरसंडकर (वय ५५ वर्षे) रा. जानेफळ हा तेथे आला. व त्यांनी फिर्यादीचा भाऊ श्याम मुरडकर यांची गच्ची धरून ‘तू बस स्टैंडवर मला काय म्हणाला?’ असे म्हणून कमरेतून गुराची चामडी काढण्याची लोखंडे रापीने जीवानीशी ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे पोटात व शरीरावर वार करून त्यास गंभीर जखमी करून पळून गेला. अशा फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा क्रमांक ३३/२३ कलम ३०७ भादविंप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

याघटनेची पोलिस स्टेशनमध्ये माहिती मिळाली. सदर गुन्ह्यातील आरोपी हा चौकात असल्याची माहिती मिळाली व अरविंद चव्हाण पोलीस शिपाई व आणि एकजण पोलीस मोटारसायकल वर जाऊन आरोपीला घाईगडबडीत पळत जातांना दिसल्यावरून त्यास आवाज देऊन थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळत पुढे जाऊ लागला. शेवटी पोलीस स्टाफ साह्याने त्याच पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्याच्याजवळील गुरांची चामडी काढण्याची लोखंडी रापीने पोलीस कॉन्स्टेबल ब.नं. १७२ अरविंद चव्हाण यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. सदर आरोपीस अखेर पोलीस स्टेशन जानेफळ स्टाफच्या मदतीने सौम्य बळाचा वापर करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाई करण्यात जानेफळचे ठाणेदार राहुल गौंदे व सहकारी करित आहे.


अन् श्याम जखमी अवस्थेत घरी..
रमा नगरात घडलेले हे थरारनाट्य तेथे असणार्‍या लोकांनी ऑखोदेखा पाहिले. रमा नगरात चालणारी अवैध दारू विक्रीमुळे भांडणं झाले आहे. सर्व तेथे राहणारी माय माऊली व शाळेतील मुलांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. थरार नाट्यात जखमी अवस्थेत श्याम घरी जात असताना रक्त सांडले. लगेच त्याला मेहकर व औरंगाबादला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.


घटना सीसीटीव्ही मध्ये कैद का?
रमाई चौकात खुलेआम दारूविक्री सुरू आहे. संपूर्ण दारू विक्री सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद होत असते. महिलांना विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. तरीही जानेफळचे ठाणेदार काहीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे सर्व लोक उलटसुलट चर्चा करताना दिसतात. जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी जानेफळात अवैध दारूविक्री सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद होते की नाही. सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज निर्माण झाली असल्याचे जानेफळातील जनता मागणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!