Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

ख्रिश्चन समाजाचा छळ करणे थांबवा; सोलापुरात ख्रिश्चन समाजाचा मूक मोर्चा!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये कलम २५ मध्ये सर्वांना धर्माचे स्वातंत्र्य दिले आहे. आम्ही सर्व भारतीय आहोत. त्यामुळे इतर भारतीयाप्रमाणे आम्हालादेखील समान अधिकार मिळावे, आमचा होणारा छळ थांबवा या मागणीसाठी ख्रिश्चन धर्मगुरू व ख्रिश्चन बांधवाचा हजारो संख्येने रस्त्यावर उतरुन शासनाचा निषेध व्यक्त केला. सोलापुरात ख्रिश्चन समाजाचा विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी हजारो ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ख्रिश्चन समाजाची ओळख शांतता प्रिय आहे. मानवी मूल्ये, मानवतावाद याची जोपासना करताना आमच्या समाजाने प्रभू येशूच्या शिकवणीनुसार कायमच प्रेमाचा संदेश दिला आहे. परंतु ख्रिश्चन धर्मगुरू व धर्मस्थळ यावर होणारे हल्ले आणि छळ थांबवा, अशी मागणी ख्रिश्चन धर्म गुरूनी केली. आजवर समाजाची वाटचाल ही बंधू भावाने राहिली आहे. अशी जीवन पद्धती असताना समाजाने शैक्षणिक, आरोग्य अशा क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात समाज हिताचे मोठे कार्य उभारले आहे. मदर तेरेसा यांच्या कार्याचा या ठिकाणी उल्लेख करणे आम्हाला महत्वाच वाटतं. कोणताही भेदभाव न बाळगता सेवाधर्म आमचा समाज बाळगून आहे. याचे आजवर कौतुक आणि दखल देखील घेण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर या सेवा कार्याचा गौरव देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. ख्रिस्ती जीवन पद्धती जगत असताना अन्य धर्मियांच्या उपासना पद्धतीचा समाजाने नेहमीच आदर राखला आहे. अल्पसंख्यांक असा हा समाज असला तरी देशाची प्रगती, विकास, वाटचाल या मध्ये ख्रिश्चन समाजाचं भरीव असं योगदान राहिलं आहे. याची नोंद इतिहास आणि वर्तमानात आपल्याला दिसून येते. असं असताना मागील काही काळापासून घडणार्‍या घटना समाजाची चिंता वाढवणार्‍या आणि असुरक्षितता निर्माण करणार्‍या ठरत आहे. याचा आम्ही सोलापूर शहर जिल्हा ख्रिश्चन समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून निषेध नोंदवत आहोत. तसेच या निवेदनाद्वारे आपणांस विनंती कि समाजाच्या या भावना आपण सरकार दरबारी मांडून योग्य तो न्याय मिळावा.

घटनेने आपआपल्या धर्मानुसार जगण्याचा हक्क अधिकार दिलेला असताना काही गैरसमजुतीतून ठरवून अन्याय आणि अत्याचार तसंच दहशत निर्माण केली जात आहे. याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी ख्रिश्चन समजाच्यावतीने मोर्चे काढून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरातील आम्ही ख्रिश्चन समाज बांधव आपल्यासमोर निवेदनाद्वारे भावना मांडत असून याप्रकरणी न्याय मिळावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले. यावेळी रेव्ह. रणसिंगे धर्मगुरू, रेव्ह. सचिन पारवे, धर्मगुरू फादर लुईस डिमेलो, सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे, रेव्ह. देवदास बेळळी, धर्मगुरू संजीव मोरे, रेव्ह. इम्मानुएल म्हेत्रे आदी उपस्थित होते.


या आहेत घडलेल्या घटना
– छत्तीसगड चर्चची तोडफोड करण्यात आली
– देशात रोज कुठे ना कुठे अशा घटना समोर येताहेत
– सांगली आटपाडी इथे धर्मांतराच्या संयशावरून ख्रिश्चन धर्मगुरूंवर हल्ले करण्यात
आले
– आळंदी येथे प्रार्थनेला अटकाव केला गेला
– रायगड जिल्ह्यातील नागोराठाणे या गावी धर्मग्रंथ जाळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला
– सांगोला इथे धर्मगुरूंना दमदाटी करण्याची घटना घडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!