सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई कर्मचार्यांची मुलगी न्यायाधीश झाल्याने सर्वत्र तिचे व तिच्या वडिलांचे अभिनंदन केले जात आहे. या कर्मचार्यांचे नाव सुनील पुळूजकर तर स्नेहा सुनील पुळुजकर असे या आई-वडिलांचे स्वप्न साकार करणार्या कन्येचे नाव आहे.
स्नेहा रुचकर या न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत कुमारी स्नेहा पुळुजकर यांचे शिक्षण झाले असून, त्या बीईएनटीसी, एलएलबी, एल.एम.एम. झाल्या आहेत. पहिल्याच परीक्षेत त्यांना यश मिळाल्याने बँकेच्या सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रशासकीय मंडळ कुंदन भोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई, व्यवस्थापक आर. एन. जाधव, न्यायाधीश कन्येचे वडील सुनील पुळुजकर व बँकेचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.