कर्जत (प्रतिनिधी) – सन १९८०-८१ सालीच्या मैत्रिणी आणि सध्या सासुरवाशीण असणाऱ्या कर्जतच्या ४० वर्षांनंतर एकत्र आलेल्या लेकिंना प्रवीणदादा घुले मित्रमंडळाने संत सदगुरू गोदड महाराज ध्यान मंदिरात बोलावुन त्यांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पाडला.
जीवा-भावाच्या शालेय मैत्रीण मात्र लग्नानंतर संसाराच्या ओघात प्रत्येकीचा दुरावा निर्माण झालेला. सण-उत्सव किंवा यात्रा काळात मोजक्याच जणींची होणारी भेट मनाला समाधान देत होती. ज्यांच्या भेटी होत नव्हत्या त्यांचे काय चालले आहे. ती कशी आहे ? या शब्दांच्या प्रपंचा पलीकडे कोणी जात नसताना. सोशल मीडियाची ताकद वापरत संपर्क वाढला एकामेकिना जोड़त अनेक जणी जोडल्या गेल्या कर्जतलांच एकत्र जमन्याचे नियोजन ठरले. रथसप्तमीच्या मुहूर्तावर (१९८०-८१) दहावीच्या बॅच़्या सर्व विद्यार्थींनीचे गेट टुगेदर ठरले. यात कन्या विद्यालय, अमरनाथ विद्यालय, दादा पाटिल महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीं होत्या. तब्ब्ल चाळीस वर्षांनंतर या एकत्र आल्या होत्या. त्यांनी आपलं बालपन ज्या ठिकाणी घालवल, जेथे आपण शिकलो त्या ठिकाणी एकत्र यायचे असे त्यांनी ठरवले कोणाच्याहि घरी न जाता आपन सगळे एकत्र राहायचे त्या सर्वजनी मिळून शिवपार्वती मंगल कार्यालयात मुक्कामास थांबल्या, त्या सगळ्या मिळुन २५ जनी होत्या. कर्जत मध्ये राहणार्याच्या मदतीने या सर्व मैत्रिनीची एकत्र मंगल कार्यालयात राहन्याची व्यवस्था करण्यात आली. त्या सर्व जणी संध्याकाळी ग्रामदैवत संत सदगुरू गोदड महाराज यांचे पाटिल गल्ली येथील जन्मस्थळ ( ध्यान मंदिर) येथे दर्शन घेण्यासाठी आल्या. यात या मंदिराचे विश्वस्त घुले च्या भगिनी सुलभाताई तोरडमल पण होत्या. त्यामुळे प्रवीण घुले मित्रमंडळाने आणि विशेष करून माजी जिल्हा परिषद सदस्या मोहिनी घुले, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले आणि कन्या आदिती घुले यांनी सर्व सासुरवाशीण कर्जतच्या लेकींचा मान-सन्मान केला.
यावेळी बोलताना प्रवीण घुले म्हणाले की, अनेक भगिनी आज कर्जतला आले असल्याचे समजताच अचानक हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. भगिनींचा मान-सन्मान ठेवण्यात काही कमतरता राहिली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. या भाऊरायास आपण माफ करावे. मात्र आजची ही उणीव पुढील वेळेस अजून ज्या बहिणी बाहेर राहिल्या आहेत त्यांना कर्जतला बोलवत मोठा कार्यक्रम घेण्याचा मानस घुले यांनी व्यक्त केला. यावेळी अनिता व्यवहारे, बहार पठाण, सुनंदा धोंगडे, मीना कुलकर्णी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी सर्व सासुरवाशीण कर्जतकर लेकींच्या हस्ते ध्यान मंदिरात श्री संत सदगुरु गोदड महाराजांची आरती करण्यात आली. सर्वांना खूप प्रसन्न वाटले नंतर त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यात आला. सगळया खूप भारावून गेल्या. माहेरचे स्नेह-प्रेम पाहून लेकींचा देखील अश्रूचा बांध फुटला.