सोलापूर (संदीप येरवडे) – जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागामध्ये मंगळवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यामुळे माध्यमिक विभागाचे कार्यालय चालू आहे की बंद, याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. तर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाबर यांचा मात्र नंबर लागत नसल्यामुळे अनेकांना भेटता आले नाही.
सोमवारी शिक्षणाधिकारी बाबर हे आल्यानंतर माध्यमाने त्यांना मोबाईल नंबर देण्याची विनंती केली. त्यानंतर बाबर यांनी माझा नंबर संध्याकाळी सुरू होईल निश्चित रहा, असे आश्वासन माध्यमांना दिले. परंतु शिक्षणाधिकारी बाबर यांचा जुना नंबर मात्र बंदच लागत असल्याने माध्यम प्रतिनिधींना देखील टाळाटाळ करण्याचा प्रयत्न शिक्षणाधिकारी यांनी केला. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अनेक प्रभारी अधिकार्यावर झेडपीचा कारभार सुरू आहे. अशातच माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी हे अस्थिर दिसत असल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाचे पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला. विशेष म्हणजे, मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे देखील नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदसह माध्यमिक विभागातील शिक्षण विभागात शुकशुकाट दिसत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला असावा.
प्रशासकच्या कार्यकाळात प्रशासन सुस्तावले!
झेडपीचे सदस्य असताना एखादा अधिकारी कामचुकार करीत असेल तर त्या अधिकार्याला धडा शिकवण्यासाठी सदस्य तक्रार करीत होते. त्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित अधिकार्यावर कारवाई देखील होत होती. परंतु प्रशासक असल्यामुळे सध्या प्रशासनातील एचओडी सुस्तावले असल्याचे दिसत आहे.