आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडूळगावात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आळंदी नगरपालिका माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृती अभियानाचे महाविद्यालयांमध्ये उत्साहात आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात होते.
या प्रसंगी व्यासपीठावर श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार -संचालक मयूर ढमाले, प्राध्यापक परमेश्वर भताशे, प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संजीव कांबळे, आळंदी नगरपरिषद शहर समन्वयक किरण आरडे, आरोग्य निरीक्षक हनुमंत लोखंडे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, प्रा. माणिक कसाब, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. प्रवीण डोळस, उपस्थित होते. या प्रसंगी ई – कचरा विलगीकरण जनजागृती अभियानात शहर समन्वयक किरण आरडे यांनी माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृती या विषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करीत ई – कचरा विलगीकरण करून आळंदी नागरपरिषदे कडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले. त्यांनी रोपवाटिकेची निर्मिती, जैव-विविधता रजिस्टर, वृक्ष आराखडा, एकल वापर प्लॅस्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, ई-कचरा व्यवस्थापन या बाबत मार्गदर्शन करीत प्रभावी संवाद साधला. यावेळी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृती, अपारंपरिक ऊर्जा वापर, पाणी , वीज बचत या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी समाजातील प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच ई – कचरा, सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थापन या संदर्भात मार्गदर्शन केले. तत् स्वच्छता, पर्यावरण रक्षण, अपारंपरिक ऊर्जेचा वापर आणि जनजागृती तसेच माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत ई – कचरा विलगीकरण जनजागृतीस प्रबोधन करीत भारताचे भावी नागरिक सुसंस्कृत होऊन समाज विकासात हातभार लावण्याचे आवाहन प्राचार्य थोरात यांनी केले. सूत्र संचालन प्राध्यापक प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संजीव कांबळे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. कैलास अस्तरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.