SOLAPUR

आचेगांवच्या उपसरपंचपदी रफिक मुल्ला यांची बिनविरोध निवड

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – आचेगांव (ता. दक्षिण सोलापूर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रफिक चांदसो मुल्ला यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी सरपंच विश्रांती पाटील यांनी रफिक मुल्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या उपसरपंच निवडीची प्रक्रिया सरपंच तथा पीठासीन अधिकारी विश्रांती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक प्रक्रिया निरीक्षक आरती धबडे, तलाठी दीपक ठेंगील व ग्रामसेवक रमेश गायकवाड यांच्या उपस्थित झाली.

यावेळी सर्वसहमतीने मुल्ला यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. निवडीनंतर ग्रामपंचायत प्रांगणात नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा व माजी सदस्यांचा सत्कार करून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आले. यावेळी माजी पोलीस निरीक्षक दत्ता पाटील, महादेव पाटील, हारून बिराजदार माजी सरपंच बलवान गोतसुर्वे, अमोगसिद्ध पाटील, भीमा गायकवाड, शशिकला क्षीरसागर, महिबूब पटेल, ताजोद्दीन बिराजदार, इरफान पटेल, सिद्धू पाटील, जावेद बिराजदार, शावरसिद्ध पाटील, संजय पाटील,चंदू शिलेणी यांच्यासह सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!