ChikhaliHead linesVidharbha

मिसाळवाडीच्या उपसरपंचपदी हनुमान मिसाळ बिनविरोध

– मिसाळवाडी ग्रामस्थांचाही जल्लोष

चिखली (विशेष प्रतिनिधी) – मुलींच्या जन्मदरात राज्यात अव्वल असलेल्या मिसाळवाडी गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली असून, सरपंचपदी यापूर्वीच विनोद तथा बाळू पाटील हे बिनविरोध निवडून आले होते. तर आज झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत हनुमान मिसाळ यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी हनुमान मिसाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी यांनी त्यांना बिनविरोध उपसरपंच जाहीर केले. या निवडीनंतर चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निकटवर्तीय तथा मा. तालुका अध्यक्ष डॉ. विकास मिसाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ ग्रूपचे मुख्य संपादक तथा ‘साधना न्यूज टीव्ही’चे कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल ग्रामस्थांनीदेखील जल्लोष केला आहे.

मिसाळवाडी गावाची ग्रामपंचायत अराजकीय व बिनविरोध व्हावी, यासाठी गावातील सर्व मान्यवरांसह राज्याच्या विविध भागात उच्चपदस्थ असलेल्या भूमिपुत्रांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार, सरपंचपदी विनोद तथा बाळू पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली. तर सरपंचपदासाठी निवडणुकीत इच्छुक असलेले प्रमुख विरोधक हनुमान मिसाळ यांना पहिले तीन वर्षे उपसरपंच व उर्वरित दोन वर्षाकरिता मागासवर्गीय समाजातील दोन सदस्यांना उपसरपंचपदी संधी देण्याचे निश्चित झालेले आहे. या तडजोडीला सुरूवातीला हनुमान मिसाळ हे तयार नव्हते. आपण सरपंचपदी मोठ्या मताधिक्क्याने निवडून येऊ, असा त्यांना विश्वास होता. दुसरीकडे, विनोद पाटील यांनाही आपण बहुमताने विजयी होऊ, असा विश्वास होता. परंतु, ग्रामपंचायत बिनविरोध करून राज्यात सकारात्मक संदेश देण्याचा ग्रामस्थ व वरिष्ठ भूमिपुत्रांचा निर्धार असल्याने, या दोन्हीही नेत्यांची सर्वांनी समजूत काढली, व विनोद पाटील हे सरपंच तर हनुमान मिसाळ हे उपसरपंचपदावर राजी झाले. मिसाळवाडी ग्रामपंचायत ही कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या अधिपत्याखाली नसून, सर्वच राजकीय पक्षांच्या विचारधारेचा सन्मान करणारे सदस्य, सरपंच व उपसरपंच हे ग्रामपंचायतीचे कारभारी झालेले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या गाव कारभार्‍यांना शुभेच्छा देत, गावाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

ग्रामपंचायत बिनविरोध पार पाडण्यासाठी गावाचे भूमिपुत्र प्रामुख्याने बुलढाणा वित्त विभागातील लेखा व वित्त संचालक दिनकर बावस्कर, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योगपती बळीराम मिसाळ, ज्येष्ठ संपादक व ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ मीडिया ग्रूपचे मुख्य संपादक, ईव्ही डील कंपनीचे अध्यक्ष पुरुषोत्तम सांगळे, माजी सरपंच तेजराव मिसाळ, माजी सरपंच देवीदास मिसाळ (साधुबुवा), माजी सरपंच परमेश्वर मिसाळ, माजी मुख्याध्यापक विष्णू मिसाळ गुरुजी, आदर्श मुख्याध्यापक प्रवीण मिसाळ, आदर्श मुख्याध्यापक चंद्रभान मिसाळ, गणपत गुरुजी, माजी पोलिस पाटील हनुमान मिसाळ, रवी मिसाळ, संजय भगत, तुकाराम भगत, अशोक पाटील, सुधाकर पाटील, बंडू पाटील, प्रकाश पाटील, रमेश कोलते, विजय कोलते, काशिनाथ कोलते, शिवदास मिसाळ, मधुकर सावकार, देविदास सावकार, शेणफड काकडे, शेणफड मिसाळ, नारायण गुरुजी, कृषीतज्ज्ञ शशिकांत अण्णा मिसाळ, गजानन मिसाळ, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती शिनगारे ताई, सुभाष शिनगारे, गुलाबराव सुरडकर, किशोर सुरडकर, जगदेव सुरडकर, श्याम भगत, संतोष भगत, तुकाराम मिसाळ, शरद कोलते, शरद दौंड, रामकृष्ण मिसाळ, अनंता मिसाळ, सुरेश भगत, निवृत्ती झाल्टे, नीलेश मिसाळ, शिवशंकर मिसाळ आदी मान्यवरांनी पुढाकार घेतला होता.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!