बिबी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महाराष्ट्र शासन अंगीकृत या कंपनीचे सर्व अभियंते व कर्मचारी हे दिनांक ४ जानेवारीपासून संपावर जात आहेत. अदानी यांनी वीज नियमक आयोगाकडे समांतर वीज पुरवठा करण्यासाठी अर्ज दाखल केला असून, त्यांना समांतर वीज कायद्याचा परवाना देऊ नये, यासाठी सर्व कर्मचारी संघटना व कृती समिती यांनी संप पुकारलेला आहे. महावितरणचे खासगीकरण करण्याचा घाट केंद्र व राज्य सरकारने रचला असून, तो हाणून पाडण्यासाठी हा संप आहे.
संयुक्त कृती समितीअंतर्गत सर्व संघटना या संपात सहभागी असून, संपामध्ये बिबी तालुका लोणार येथील कनिष्ठ अभियंता राजगुरू साहेब व कर्मचारी संजय खारडे, रामेश्वर मुंडे, कराड, रवी डोईफोडे, विजय नागरे, रवी शेजुळ, विशाल वानखेडे, कोमल राठोड, राम बाबा हे सर्व कर्मचारी या संपामध्ये सहभागी होत आहेत. हा कायदा पारित होऊ नये व सर्व महाराष्ट्रातल्या कर्मचार्यांना न्याय मिळावा यासाठी सर्व कर्मचारी व सर्व संघटना ह्या एकवटल्या असून, संपावर जात आहेत. जर सरकारने अदानी यांना परवाना दिला तर शेतकरी, शेतमजूर, सर्वसाधारण वर्ग यांना जो महावितरणकडून विजेची दरवाढ होईल व शेतकर्यांचा व सर्वसाधारण जनतेचे यामध्ये खूप प्रमाणात नुकसान होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
—————–