LONAR

भरधाव बोलोरेने उडविले, बालक ठार

बिबी (प्रतिनिधी) – भरधाव बोलोरेने १४ वर्षीय विद्यार्थ्याला धडक दिल्याने या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज बिबी ते दुसरबीड मार्गावरील धाईत यांच्या शेतानजीक घडली. राजरत्न संजय साळवे असे या मुलाचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

राजरत्न साळवे हा मुलगा त्याच्या मित्रांसह शेतात जात असताना, भरधाव जाणार्‍या बोलोरेने त्याला धडक दिली. त्याला गंभीर जखमी अवस्थेत बिबी येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातप्रकरणी बिबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी बोलोरोचालक शाहरूख हसन चौधरी (रा. हिवराखंड, ता. लोणार) याला ताब्यात घेतले होते. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल दिनेश चव्हाण, पोलिस नाईक विष्णू जायभाये, रोहिदास पांढरे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!