KARAJAT

घरालाच मंदिर बनविण्याची गरज : सुयोग ऋषीजी

कर्जत (प्रतिनिधी) – घरात मंदिर बनविण्याऐवजी घरालाच मंदिर बनवणे आवश्यक असून, यासाठी प्रत्येकाने हाथ जोडून झुकने आवश्यक असल्याचे मत प. पू सुयोग ऋषीजी यांनी व्यक्त केले.

कर्जत जैन स्थानक येथे नवकार साधक, श्रमण संघीय सलाहकार, उपप्रवर्तक प. पु. तारक ऋषीजी म. सा. आगमज्ञाता वाणी के जादुगर डॉ. सुयोग ऋषीजी म. सा. विद्याअभिलाषी तपस्वी सुजित ऋषीजी म. सा. मधुरगायक सेवाभावी शिवेंद्रऋषीजी म. सा. आदी ठाणा ४, यांचेसह मधुर व्याख्यानी प. पु. उदय प्रभाजी म. सा. सेवाव्रती करुणाप्रभाजी म. सा. आदी ठाना २ हे विराजित आहेत. कर्जत शहरात सुरू असलेल्या प्रवचन मालिकेत उदय प्रभाजी म. सा. यांनी दानाचे महत्व विशद करताना प्रत्येकाने काही ना काही दान दिले पाहिजे, असे म्हटले तर डॉ. सुयोगऋषीजी म. सा. यांनी प्रत्येकाने आपल्या घरालाच मंदिर बनविण्याबाबत मार्गदर्शन करताना म्हटले की, ज्या व्यक्ती ने जन्म घेतला आहे त्या व्यक्तीकडे देण्याची ताकद आहे. फक्त धन असलेला व्यक्तीचं देऊ शकतो ही धारणा दूर करा. धन शिवाय समोर व्यक्तीला आनंद द्या, समोरच्या व्यक्तीला स्माईल द्या, आपण काहीही देऊ शकता, मात्र देण्याची तयारी ठेवा. आपण ज्या वेळी असे करतो त्यावेळी आपले घर मंदिर बनते, स्वर्ग बनते, ज्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात प्रसन्नता आहे, एकमेका प्रती प्रेम आहे, मैत्री आहे एकमेकात आपलेपणा आहे तो स्वर्ग असतो. जेथे ओढाओढी आहे, भांडणे आहेत कटुता आहे, एकमेका प्रती दुश्मनी आहे, जेथे व्यक्तीचे चेहरे हिरमुसले आहेत ते नरक नाही तर काय आहे? आपले घर स्वर्ग बनले पाहिजे, स्वर्गापेक्षा सुंदर बनले पाहिजे, घरात मंदिर असो वा नसो काही फरक पडणार नाही, घरालाच मंदिर बनवले तर त्या घरावर श्री कृष्णाची, महावीरांची, नानक यांची कृपा होईल.

यासाठी काय करायला पाहिजे तर मंदिरात गेल्यावर जसे आपण दोन्ही हाथ जोडून मस्तक झुकवले पाहिजे, तसेच घराला मंदिर बनवायचे असेल तर सर्वांनी प्रथम हाथ जोडून वाकण्याची तयारी ठेवली पाहिजे, घरातील मोठ्याचा पायावर डोके ठेऊन नमस्कार केला पाहिजे, पण आज काल त्यात ही शॉर्टकट आला असून, फक्त उभ्या उभ्या गुडघ्याला हात लावला जात आहे. आपला भारत यासाठी महान आहे की येथे संस्कुती आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराला मंदिर बनवले तर आपले आयुष्यात स्वर्ग अवतरल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले. जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोकलाल कोठारी यांनी दि १ जाने २०२३ रोजी कर्जत येथे प. पु तारकऋषीजी महाराज यांची मोठी मांगलिक असून, यासाठी विविध ठिकाणचे संघ येणार आहेत. आपण ही आपल्या परिवारातील नातेवाईकांना यासाठी आमंत्रित करावे, असे आवाहन केले.


प पू तारकऋषीजी म सा यांची दररोज ३ वा मांगलिक असते, यासाठी अनेक श्रावक श्राविकाची उपस्थित दररोज कर्जत येथे होते आहे. अनेकांनी तपस्या सुरू केल्या असून, चातुर्मास नसताना चातुर्माससारखा माहोल तयार झाल्यामुळे जैन श्रावक संघात विशेष उत्साह आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!