Uncategorized

शेती, शेतकरी आणि आर्थिक साक्षरता!

आज राष्ट्रीय शेतकरी दिन (किसान डे) यानिमित्त शेतकर्‍यांना आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करणारा शुभम कोलते यांचा विशेष लेख. आर्थिक नियोजनाअभावी अनेक शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळत असून, खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने गंभीर समस्या निर्माण होत आहेत. पैसा हा झाडाला लागत नसला तरी, योग्य नियोजन केले तर पैशाची बचतही होते, आणि पैशाची वृद्धीही होते, याबाबत या लेखात CA Aspirant असलेल्या शुभम कोलते यांनी मार्गदर्शन केलेले आहे.


आज काल आपण सकाळी सकाळी वृतपत्र वाचत असतानी किंवा वृत्तवाहिन्या बघताना असे वाचतो किंवा बघतो की महागाई आभाळाला गवसणी घालत आहे, बेरोजगारी वाढत आहे. तसेच, आपला देश खरेच कृषिप्रधान देश असल्याची शंका मनात घर करू लागते, ती बातमी म्हणजे कर्ज न फेडू शकल्याने ‘शेतकरी आत्महत्या’. आज जरी आपण औद्योगिक क्षेत्रात गगनभरारी घेत असलो तरी शेतीची आणि शेतकर्‍यांची व्यथा काही संपताना दिसून येत नाही. याला अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यातीलच एक कारण म्हणजे आर्थिक साक्षरता (व्यावहारिक ज्ञान). कारण ही बाब कधी आपल्या मुलांना शाळेत शिकवली किंवा शेतकर्‍यांच्या मुलाला कधी घरी वडिलधार्‍या मंडळीकडूनही शिकविण्यात आली नाही. कारण आपण नेहमी कष्टाला महत्व दिले आणि आर्थिक साक्षरतेकडे दुर्लक्ष केले. माझ्या शेतकर्‍यांसाठी याच समस्येला मी आज येथे गवसणी घालणार आहे. खरंतर आर्थिक साक्षरता हा विषय सगळ्यांसाठी वेगवेगळा असतो.

जसे, की उद्योजकांसाठी वेगळा तर शेतकर्‍यांसाठी वेगळा. आर्थिक साक्षरता म्हणजे नुसती पैशाची बचत नसून, आपला खर्च कमी कसा करायचा याबद्दलही जागरूकता निर्माण करणे असते.
सर्व शेतकरीबंधुंनी यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात-
१) सर्व प्रथम आपण आपला आजचा अहवाल (बजेट) म्हणजेच आज आपण नेमके कुठे आहोत, याचा आराखडा बनवायला हवा. यामध्ये तुम्ही तुमची आजची स्थिती, तुमच्याकडील रोकड, कर्ज, शेती, घरातील शेतमाल इत्यादी गोष्टीची मांडणी करायला हवी.
२) त्यानंतर आपण आपला समोरील वर्षाचा वार्षिक अहवाल (अ‍ॅन्युअल बजेट) बनवायला हवे, ज्यामध्ये तुम्ही समोरील वर्षात येणारे उत्पन्न आणि लागणारा खर्च याचा अंदाज अगोदरच लिहून ठेवायचा असतो. साधे उदाहरण आहे – जर आपल्याला बाजाराला किंवा कुठे फिरायला जायचे असले तरी आपण अगोदरच त्या खर्चाची अंदाज लावून पुढची गोष्ट ठरवतो. तसेच आपण शेतीबाबतही केले पाहिजे.
३) अशा पद्धती ओळखा ज्या तुम्हाला तुमची शेतीची सुपिकता वाढवण्यास मदत करतील, आणि त्यामुळे तुम्ही कालांतराने तुमचे उत्पन्न वाढवू शकाल.
४) तुम्ही तुमचे उत्पन्न खालील प्रकारे लिहून ठेवले पाहिजे –
– दररोज/साप्ताहिक – जसे की दुधाचे पैसे
– तीनमाही – जसे की गव्हू , सोयबिनचे पैसे
– वार्षिक – फळांचे पैसे इत्यादि
– तुमचे खर्च जसे की – खते, बीबियाणे यांचे खर्च लिहून ठेवले पाहिजे.
यामध्ये जर आपण कृत्रिम खतांऐवजी जर गुरांच्या शेणाच्या खताचा वापर केला तर आपल्या आपल्या गुरणापासून उत्पन्नही मिळेल आणि कृत्रिम खतांच्या खर्चासोबत जमिनीची नपिकता होण्यापासूनही वाचवण्यास मदत होईल.
५) शेती हा व्यवसाय जवळपास १० हजार वर्षांपूर्वी पासून सुरू झाला आहे, आपल्या पूर्वजांनी नेहमी शेतीसोबत शेतीपुरक जोडधंदा केला आहे, याचा विसर आज आपल्याला पडला आहे. कोणीही कधीच एका उत्पन्नांवर अवलंबून राहत काम नाही. त्यासाठी नेहमी एकतरी जोडधंदा आपण केला पाहिजे.
६) नेहमी दोन प्रकारचे ध्येय आपण ठेवायला पाहिजे अ) अल्पकालीन आणि ब) दीर्घकालीन.
उदाहरण, जसे की, दोन शेतकरी आहेत एक गरीब १ एकर शेती असणार आणि दुसरा श्रीमंत १० एकर शेती असणारा. अ ) अल्पकालीन ध्येय, १ एकर शेती असणार्‍या गरीब शेतकार्‍याचे अल्पकालीन ध्येय असेल हवे, जसे की अगोदर आपल्यावर काही कर्ज असेल तर ते कसे फेडण्यात येईल आणि कसे आर्थिक स्वतंत्र मिळवता येईल, यावर त्यांनी काम करायला पाहिजे. तसेच १० एकर शेती असणार्‍या श्रीमंत शेतकार्‍याचे अल्पकालीन ध्येय असले पाहिजे की जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन अजून काही शेती घेणे किंवा दुसरा काहीतरी व्यवसाय सुरू करणे हा असला पाहिजे.
ब) दीर्घकालीन ध्येय- १ एकर शेती असणार्‍या शेतकर्‍याचे ध्येय असले पाहिजे की अजून शेती घेण्याचा प्रयत्न करणे. १० एकर शेती असणार्‍या शेतकार्‍याने प्रयत्न केला पाहिजे की आपले फळे आणि पालेभाज्या जागतिक बाजारपेठेत विकता येईल का, यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. तसेच नवनवीन प्रयोग आपण आपल्या शेतात करून बघितले पाहिजे, जेणे करून आपल्याला चांगला पैसा मिळू शकेल.
७) आपल्याला अजूनही काही खर्च असतात जसे की मुलांचे शिक्षण, मुलामुलींचे लग्न, किंवा सुखदुःखे, यासाठी आपण नेहमी काही पॉलिसी घेतल्या पाहिजेत. जसे की, पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, सुकन्या समृद्धी स्कीम, इत्यादि.
८) नेहमी अशा गोष्टी खरेदी करा की ज्यांपासून उत्पन्न मिळेल, आणि अशा गोष्टी टाळा की ज्यांपासून आपल्यावरती कर्जाचे बोजे वाढेल.
९) शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की नेहमी आशावादी रहा, आणि संयम ठेवा, कारण वेळेबद्दल एक गोष्ट चांगली आहे की ती नेहमी बदलते.

(लेखक हे CA and CMA Aspirant आहेत.  ते मूळचे मिसाळवाडी, ता. चिखली येथील रहिवासी असून, सद्या पुणे येथे राहतात. Email : shubhamkolate01@gmail.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!