धुळे : रक्ताचे घट्ट नाते म्हणजे बहीण भावाचे असते, परंतु या नात्याला काळीमा फासत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोस्टे. हद्दीमध्ये जी बहिण भावाला रक्षाबंधनला राखी बांधते, भाऊ बहिणीला संरक्षणाची हमी देते. त्याच राक्षसी प्रवृत्तीच्या सैतानाने बहिणीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन तिला गळफास देवून तिला फासावर चढविले, तो सैतान एवढ्यावरच न थांबता त्याने पहाटेच्या वेळी तिचा अंत्यविधी उरकून टाकल्याची घटना समोर आली. पोलिसांनी कोणताही पुरावा नसतांना आरोपी संदीप हालोर याला पोलिसांनी चोविस तासाच्याआत बेड्या ठोकल्या. आरोपी सध्या कोठडीत आहे.
साक्री तालुक्यात निजामपूर पोस्टे.हद्दीतील संदीप हालोर (वय 24) याने बहिण पुष्पा हालोर (वय २२) हीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय मनामध्ये धरुन तिला बेदम मारहाण केली. तो एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने बहिण पुष्पाला साडीच्या लेसने गळफास लावला व ती गतप्राण होत नाही तोपर्यंत त्याच झाडाजवळ थांबून राहिला. हत्येनंतर आरोपीने घरी जावून बहिण पुष्पाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आई व मित्रांसह गावातील लोकांना मृत्यूविषयी खोटी माहिती दिली. पहाटे पाचच्या सुमारास तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी आरोपीने सर्व आरोपी नष्ट केले होते. या प्रकरणी निमाजपूर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत संशयीत आारोपी भावास गावातूनच ताब्यात घेतले, त्याला पोलिसी खाक्या दाखविताच बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या संशयावरुन तिचा खून केल्याची कबुली दिली. आरोपीस साक्री न्यायालयात हजर केले असता आरोपी संदीप हालोर याला न्यायालयात 19 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनाविली आहे. या घटनेमुळे संपूर्ण साक्री तालुक्यासह धुळे जिल्हा हादरुन गेला आहे.