शनिशिंगणापूर (प्रतिनिधी) : जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर येथे महिलांना चौथर्यावर प्रवेश बंद असताना, मध्यंतरी झालेल्या काही आंदोलनांमुळे भाविकांना केवळ पादुकापर्यंत प्रवेश देण्यात आला होता. परंतु, आता शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळाने चौथर्यावर जाऊन शनिदेवाला तैलाभिषेक करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर आता शनिशिंगणापुरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत, पुरुषांसोबतच महिलांनाही तैलाभिषेक करण्यास प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी ट्रस्टची ५०० रुपयांची पावती घ्यावी लागेल. त्याची अंमलबजावणी काल, शनिवारपासून सुरू झाली. शनिदेव बालब्रह्मचारी असल्याने महिला दुरूनच दर्शन घेत असत. चौथर्यावर जाऊन दर्शन घेण्यास महिलांना मनाई होती. या वादावर आता पडदा पडला असून, महिलांसाठी चौथर्याजवळ जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Leave a Reply