आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयात आळंदी कार्तिकी यात्रा कालावधीतील सात दिवसांत सुमारे २४ हजारावर रुग्णांची आरोग्य तपासणी करून उपचार आरोग्य सेवा देण्यात आल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालय आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले.
राज्यातून येणार्या भाविक, नागरिक आणि वारकरी यांच्या आरोग्य सेवेस दक्षता घेऊन प्राधान्य देण्यात आले. कार्तिकी यात्रेच्या सात दिवसांच्या कार्यकाळात विविध ठिकाणी आरोग्य सेवा मदत केंद्र, बाह्यारुग आणि आंतररुग्ण सेवा २४ तास कार्यरत ठेवण्यात आल्याचे डॉ. शिंदे म्हणाल्यात. या आरोग्य सेवेत २३ हजार १३ बाह्य रुग्ण सेवेचा लाभ भाविकांनी घेतला. याशिवाय आंतर रुग्ण ५५, क्ष-किरण तपासणी १९९, लॅब टेस्ट ७६२, आळंदीतील बूथवरून उपचारासाठी आलेले रुग्ण ७, उपचारासाठी हायर सेंटरला आळंदीतून २० रुग्ण पाठविण्यात आले होते. यासह दंतचिकित्सा १६१ रूग्णांची करण्यात आली.
डॉ. शिंदे म्हणाल्या, यात्रा काळात भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आळंदी ग्रामीण रुग्णालय २४ तास सज्ज ठेवण्यात आले होते. पुरेशा प्रमाणात उपचार साधन, सुविधा औषधांचा साथ साठा उपलब्द्ध होते. यासाठी वरिष्ठांसह प्रशासनाचे खूप सहकार्य मिळाले. यात्रा काळात भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत काम करताना पुरेशा प्रमाणात दक्षता घेण्यात आली. भाविकांची आरोग्य सेवेत काळजी घेत असताना आरोग्य सेवेच्या कार्यातून समाधान लाभल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. आळंदी यात्रेच्या माध्यमातून रूग्णांची आरोग्य सेवा करता आली. यासाठी सर्व कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांचे नियोजनात सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.