चिखली (विशेष प्रतिनिधी) – क्रांती शौर्य सेनेच्या नेत्या कल्याणी वाघमोडे यांचा आज चिखली येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील समाज बांधव व महिलांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यानंतर वाघमोडे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या सभेलादेखील हजेरी लावली. त्या शिवसेनेच्यादेखील नेत्या असल्याने चिखली तालुक्यात त्यांनी दोन दिवस दौरे करून धनगर, ओबीसी आरक्षणांसह युवक व महिलांच्या समस्यांबाबत जनजागृती केली.
आज चिखली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शेतकरी मेळाव्यासाठी क्रांती शौर्य सेनेच्या तथा शिवसेना महिला नेत्या दोन दिवसीय दौर्यासाठी उपस्थित होत्या. यावेळी चिखली तालुक्यातील अनेक समाजबांधव, भगिनी यांच्यावतीने महाराष्ट्रभर कार्य असणार्या कल्याणा वाघमोडे यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण, धनगर – मेंढपाळ प्रश्न, युवक बेरोजगारी, महिला सुरक्षा या मुद्द्यावर त्यांनी परखड मत व्यक्त केले. यावेळी कडुबा गवारे, एस.वीर सर, आर.डी शिंदे, सागर खरात, गजानन काटकर, गजानन कळंगे, महेंद्र वाघमोडे, ज्ञानेश्वर गावडे, द्वारका काळे, मंजुळा गवारे, शैलेश धारे, गोविंद सुसर, प्रसाद येवले आदी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————